एक्स्प्लोर

Ramdas Athawale : राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य

Rajyasabha Election Marathi : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला चार जागा येणार असून त्यापैकी एका जागेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड निश्चित आहे. 

परभणी : मी राज्यसभेवर जाणार हे मला आधीच माहीत आहे, मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे, असं स्पष्ट वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.भाजपकडून राज्यसभा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आठवले यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत काही बिघाड झाला तर सातवी जागाही आम्ही जिंकू, असा दावा केला. परभणीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा उमेदवारीवर पहिली प्रतिक्रिया दिली.

येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेच्या सात जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार, महायुतीचे सहा खासदार सहज निवडून जातील, तर महाविकास आघाडीकडून एक खासदार निवडून जाणार आहे. 

भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या चार जागा येणार असून त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संधी मिळणार आहे. त्याचसोबत भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांचेही नाव राज्यसभेसाठी चर्चित आहे. राज्यसभा निश्चित असली तरी लोकसभेची इच्छा कायम असल्याचं स्पष्ट करत रामदास आठवले यांनी आगामी राजकीय घडामोडींना वेगळं वळण देण्याचे संकेत दिले आहेत.

रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे (Republican Party Unity)

रिपब्लिकन पार्टीच्या सर्व गटांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत रामदास आठवले म्हणाले की, "या एकत्रीकरणाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) यांनी केल्यास समाजाला मोठा फायदा होईल. यामुळे आमच्या समाजाची ताकद वाढेल आणि योग्य प्रतिनिधित्व मिळेल.” 

युवकांना उद्योग, गरिबी निर्मूलनावर भर (Social Justice & Employment)

परभणी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, समाजातील युवकांना उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या खात्यामार्फत विविध योजना राबवून रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतातील गरिबी दूर करण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच देशातील गरिबी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget