एक्स्प्लोर

Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं

Gadchiroli Leopard Attack : एकीकडे गडचिरोलीमध्ये बिबट्याने तरुणावर हल्ला केला असताना दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये 20 हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. 

Gadchiroli Leopard Attack : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्यापासून बचावासाठी वनविभागाकडून जनजागृतीपर चित्रफीत दाखवली जात असतानाच गावात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 32 वर्षीय युवकावर हल्ला केला. ही घटना धमदीटोला येथे मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव सदानंद उईके असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जनजागृतीदरम्यानच हल्ला (Leopard Attack During Awareness Program)

मागील आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यातील धमदीटोला या गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे. ही परिस्थिती लक्षात घेता वनविभागाचे पथक फिरते चित्रपटगृह घेऊन गावात दाखल झाले होते. बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन सुरू असतानाच सदानंद उईके हा युवक लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला.

मात्र तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घेतली. सदानंदने आरडाओरड केल्यानंतर चित्रफीत पाहणारे नागरिक आणि वनकर्मचारी घटनास्थळी धावले. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचा वाढता वावर (Rising Leopard Movement in Ahilyanagar)

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण आहे. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. सुमारे 20 हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करून बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी केली आहे.

बैलगाडीतून मोर्चा, पोस्ट कार्यालयात पत्रे जमा (Farmers Protest with Bullock Cart)

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपरिषद येथून बैलगाडीत शेतकऱ्यांची पत्रे आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन मोर्चा काढण्यात आला. ही सर्व पत्रे राहुरी पोस्ट कार्यालयात जमा करण्यात आली.

ऊस शेतीमुळे वाढते हल्ले (Sugarcane Fields and Leopard Attacks)

अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा मिळते. ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर त्यांचा वावर मानवी वस्तीत वाढतो. परिणामी मानवावर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वनविभागाकडून जनजागृती केली जात असली तरी प्रत्यक्ष कारवाई आणि ठोस उपाययोजनांची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget