एक्स्प्लोर

राज्यसभेच्या मतदानासाठी उरले काही तास, पण विनय कोरे अजूनही कोल्हापुरात ! संपर्क कोणी केला का ? विचारताच म्हणाले... 

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) एकेक मतासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपकडून काथ्याकूट सुरु आहे. या सर्व प्रकारावरून आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी टीका केली आहे.  

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) एकेक मतासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपकडून काथ्याकूट सुरु आहे. शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. या सर्व प्रकारावरून जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी टीका केली आहे.  

हॉटेलमध्ये आमदारांना ठेवल्याच्या बातम्या तसेच कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी उभा केलेली पाहून तसेच बसमध्ये बसवून त्यांना घेऊन जाण्याचा केलेला प्रयत्न टीव्हीवर बघायला मिळणं हे सगळं काही वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. 
 
ते पुढे म्हणाले की, मतदानापूर्वी मुंबईमध्ये जाऊन नियोजन केलं आहे. जनसुराज्य शक्ती स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली भूमिका पहिल्यांदाच जाहीर केली. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार आहे आणि एखादी भूमिका एकदा जाहीर केल्यानंतर अशा कितीतरी निवडणुका आल्या तरी आपल्याबद्दल चर्चा व्हावी किंवा आपल्याला अशा पद्धतीने जाऊन कुठेतरी हॉटेलमध्ये थांबायची पाळी यावी हे खरे तर आपल्याला निवडून दिलेल्या तीन लाख मतदारांचा अपमान असे मी मानतो.

एखाद्या वेळेला अशी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सातत्याने आपल्याबद्दल विचार व्हावा, त्याची चर्चा व्हावी हे योग्य असे मला वाटत नाही आणि तीच भूमिका मी प्रत्यक्ष आचरणातून जगायचा प्रयत्न करतो आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघात माझ्या कामाच्या ठिकाणी आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धाडस केलं नाही 

मतदानासाठी कोणी संपर्क केला होता का ? असे विचारले असता ते म्हणाले की, माझे अनेक मित्र आघाडीमध्ये आहेत, पण कदाचित मी हे सांगितलं, तरी कोणाला पटणार नाही, पण माझी एक स्वतःच एक अस व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केले आहे. विरोधी पक्षाने किंवा महाविकास आघाडीमधील कोणीच मला विचारायचं धाडस केलेलं नाही. कारण, मी काय त्याचे उत्तर देणार आहे आणि माझी भूमिका काय असणार आहे याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे मला कोणी संपर्क साधा करायचा प्रयत्न केलेला नाही, असे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ishan Kishan : केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines : 7AM Headlines 24 March 2024ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan : केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Chhaava Box Office Collection Day 38: फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Embed widget