![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur News : अडीच महिन्यांपूर्वी आई गेली, नैराश्यात कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाची राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट
आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
![Kolhapur News : अडीच महिन्यांपूर्वी आई गेली, नैराश्यात कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाची राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट Kolhapur News Mother passed away two and a half months ago highly educated own brother in Kolhapur in depression ended his life by jumping into Rajaram lake Kolhapur News : अडीच महिन्यांपूर्वी आई गेली, नैराश्यात कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाची राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/15/5e2f13dd866a309bb3b4f8b10a5a63171723713797231736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूर शहरातील (Kolhapur News) संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हे दोघेही अविवाहित असून अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचं अडीच महिन्यांपूर्वी मे महिन्यांत निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
पती निधनानंतर पत्नीची पंचगंगा नदीत उडी घेत आत्महत्या
दरम्यान, आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून संभाजीनगर परिसरातील सीमा हरिश ढाले यांनी आज (15 ऑगस्ट) सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांचे पती हरीश विष्णू ढाले यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
एसटी बस मागे येवून दुचाकीस धडकली; विद्यार्थीनी ठार
दरम्यान, गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येवून दुचाकीस धडकल्याने दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली (वय 19) या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरील वडील आनंदा हुदली (वय 49, रा.भडगाव ता. गडहिंग्लज) हे गंभीर जखमी झाले आहेत. भडगावमधीलआनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. गडहिंग्लजहून हसूरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती. बेरडवाडीनजीक वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली. त्यावेळी एसटीच्या धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी एसटीच्या पाठीमागील चाकात अडकली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)