Kolhapur Airport : अब दिल्ली दूर नही! कोल्हापूर ते थेट दिल्ली विमानसेवेचा मुहूर्त ठरला; गोवा आणि नागपूरसाठी कोणता निर्णय झाला?
Kolhapur Airport : येत्या 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूर विमानतळाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील (Kolhapur News) उद्योजक, कारखानदारांकडून होत असलेली मागणी व अखेर पूर्णत्वास गेली आहे. कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Aiprort) कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूर विमानतळाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.
नागपूर आणि गोव्यासाठी विमान लवकरच सुरु होणार
त्याशिवाय कोल्हापूर आणि नागपूर (Nagpur) तसेच कोल्हापूर ते गोवा (Kolhapurt to Goa Flight) या दोन्ही मार्गावर सुद्धा विमान सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी दिलेल्य पत्रकातून माहिती दिली आहे. कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर इंडिगो कंपनीचे सुमारे 180 आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर- दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करणार आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवा सुरू होण्याचा प्रस्ताव भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या महासंचालकानाकडे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
कशी असेल विमानाची वेळ ?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजून दहा मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी 12:55 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर 01:25 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचेल.
इतर महत्वाच्या बातम्या