Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
Kolhapur Municipal Corporation Election: 35 वर्षापासून रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश मिळताच कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असतानाच आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये केएमटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावाव सही करताना गेल्या 35 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या 156 कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम केलं आहे. त्यामुळे 35 वर्षे रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान, 35 वर्षापासून रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश मिळताच केएमटी कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सेवेत कायम झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
महायुती म्हणून लढण्याचा निर्णय
दरम्यान, मनपा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर आणि इचलकरंजीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जागावाटपसाठी सहकारी कार्यकर्ते समित्या चर्चा करतील. जो निवडून येईल अशा उमेदवाराला उमेदवारी या सूत्रानुसार तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. कोल्हापूरमध्ये तरी चंद्रकांत दादा, मुन्ना महाडिक, अमल महाडिक आम्ही चर्चेसाठी बसलो होतो. तिन्ही पक्षाच्या समिती प्राथमिक चर्चा करतील, मग आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
तर बंडखोरी कमी होईल
दरम्यान, पुण्यातील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढतीवर ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाऊ आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील तर मग आम्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढू. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा लढती अनेकवेळा झालेल्या आहेत. जर दोघे वेगळे लढले तर बंडखोरी कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाहीत, हा एक फॉर्म्युला पिंपरी–पुण्यामध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. अजून काही नक्की वाटत नाही. मुंबई महापालिकेतील परिस्थितीबद्दल आम्ही काही बोलणार नाही. परंतु, अजितदादा योग्य तो निर्णय घेतील.
कोल्हापूर मनपा निवडणूक कार्यक्रम
निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ती 16 जानेवारी रोजी संपेल. त्यामुळे राजकीय पक्षांना अवघ्या 29 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरु होईल. अर्ज दाखल करण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारीचा दिवस दोन जानेवारी आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच महानगरपालिकेत एकाचवेळी रणधुमाळी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























