एक्स्प्लोर
Kolhapur Ganesh 2022 : देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक मार्गात बदल, 'या' ठिकाणी असेल पार्किंगची सोय
Kolhapur : देखाव्यांमुळे होणारी वाहन कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मध्यवर्ती भागात पार्किंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Kolhapur Ganesh 2022 : घरगुती गणेश विसर्जन पार पडल्यानंतर कोल्हापूर शहरात देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवर चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. देखाव्यांमुळे होणारी वाहन कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मध्यवर्ती भागात पार्किंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोणत्या मार्गावर वाहतूक बंद आणि कोणत्या मार्गावर सुरु?
- बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर येथे प्रवेश बंदी
- गांधी मैदान ते खरी कॉर्नर जाणाऱ्या सर्व चारचाकी गांधी मैदान मुख्य प्रवेशद्वारापासून महाराष्ट्र हायस्कूल मार्गे पुढे जातील
- खरी कॉर्नर मार्गे नाथागोळे तालीमकडे चारचाकी वाहने गांधी मैदान मार्गे पुढे जातील.
- तटाकडील तालीम, सरस्वती टॉकीज, उभा मारुती चौकाकडून निवृत्ती चौकाकडे येणारी सर्व वाहने बिनखांबी गणेश मंदिर किंवा गांधी मैदान मार्गे पुढे सोयीनुसार पुढे सोडण्यात येतील.
- कळंबा-नवीन वाशी नाका मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने नवीन वाशी नाका ते साई मंदिर कळंबा, इंदिरा सागर हॉल चौक, रिंगरोड मार्गे सायबर चौकातून पुढे जातील.
- गगनबावडा मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर चौक, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, इंदिरा सागर हॉल चौक, रिंगरोड मार्गे, सायबर चौक, हायवे कॅन्टीन चौक ते रेल्वे उड्डाणपूल अशी सोयीनुसार मार्गस्थ होतील
- इंदिरा सागर हॉलकडून मिरजकर तिकटीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने नंगीवली तालीम चौक येथून स.म. लोहिया हायस्कूल, खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदीर मार्गे पुढे जातील.
- शहरातून रत्नागिरी- पन्हाळ्याकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहने ताराराणी चौक, धैर्यप्रसाद चौक, पोस्ट ऑफिस चौक, महावीर कॉलेज चौक सीपीआर चौक मार्गे ये-जा करतील.
- कसबा बावडा मार्गे शहरात येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरुन तावडे हॉटेल, शिरोली टोल नाका, ताराराणी पुतळा मार्गे सोडण्यात येईल. अन्य वाहने पिंजार गल्ली, जयभवानी चौक, रेणुका मंदिर मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
या ठिकाणी पार्किंग सुविधा असेल
- बिंदू चौक मनपा पार्किंग
- प्राथमिक शाळा क्र. 9 राजारामपूरी
- मेन राजाराम हायस्कूल मैदान
- शिवाजी स्टेडियम
- पेटाळा हायस्कूल
- व्ही. टी. पाटील भवन
- शहाजी लॉ कॉलेजच्या बँकसमोर
- शाहू मिल समोरील रिकामी जागा
- दसरा चौक
- शहाजी लॉ कॉलेज मैदान
- प्रायव्हेट हायस्कूल मैदान
- गांधी मैदान
- कमला कॉलेज
- व्हीनस गाडी अड्डा
- शंभर फुटी रस्ता
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement