PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हफ्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदत
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून याअतर्गंत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी 'आपले सरकार' केंद्रांमार्फत अथवा पीएम किसान अॅपद्वारे ईकेवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी कोणाला संपर्क कराल?
सरकारने नोटीसमध्ये म्हटले आहे की बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी, जवळच्या सीएससी (CSC centres, Common Service Centres)संपर्क साधावा लागेल. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, जे शेतकरी लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याचा कालावधी 1 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया अशी पूर्ण करा
- PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
- पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
- आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.
- आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
- 'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा
नसल्यास, येथे संपर्क साधा
सर्व तपशील योग्यरित्या एंटर केल्यास आणि शिफारसीशी जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल. ते पूर्ण न झाल्यास, ते अवैध म्हणून चिन्हांकित केले जाईल. असे झाल्यास संबंधित लाभार्थीने स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक भूमिधर शेतकरी कुटुंबाला सरकारकडून दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रति वर्ष एकूण 6000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. 31 मे रोजी, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता.