एक्स्प्लोर

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखवायची आहे! अजित पवारांचा थेट इशारा 

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखववून देऊ, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेन अजित पवार यांनी कोल्हापूरमधील शिवसेना बंडखोरांना थेट इशारा दिला.

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखववून देऊ, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेन अजित पवार यांनी कोल्हापूरमधील शिवसेना बंडखोरांना थेट इशारा दिला. अजित पवार यांच्या हस्ते आज पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात खेचल्याबद्दलही त्यांनी चांगलेच शिंदे गटाला सुनावले.

शिंदे फडणवीस सरकार जातीय तेढ निर्माण करत आहे, जातीपातीचा विचार करून चालणार नाही. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा जे आमदार बाहेर पडले ते सगळेच पुढील निवडणुकीत पडल्याचे ते म्हणाले. भुजबळांसोबत आलेले 19 आमदार पडले, राणेंसोबत आलेले आमदारही पराभूत झाले. राणे पोटनिवडणुकीतही पडले. अजित पवार पुढे म्हणाले, बरेच लोक पंचायत कार्यालयाच्या उद्नघाटनसाठी तुम्ही या म्हणत होते. मी बऱ्याच दिवसांपूर्वी तारीख दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून दोन दिवस पाऊस होता. कोल्हापूरहून निघाल्यानंतरही पाऊस होता, पण पाऊस न पडता सभा पार पडली. पाऊस आणि राष्ट्रवादीचं जवळचं नातं आहे. मी मिरवणुकीला सहसा येत नाही, पण कोणाला नाराज केलं नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं. हाच उत्साह कायम ठेवायचा आहे. रॅलीतील सहभागी तरुणांचे आभार मानतो, महाराष्ट्रात बदल करून दाखवायचा आहे.

शिंदे गटावर हल्लाबोल 

ते 50 खोके एकदम ओके आहे, हे महाराष्ट्रात घडलं नव्हतं. शिवसेना दसरा मेळावा ही बाळासाहेबांची परंपरा आहे. मात्र, शिवसेनेला कोर्टात जावं लागलं. दुसऱ्याचा विचार ऐकू देणार नाही, असं कसं चालेल? याचा विचार केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जी जबाबदारी द्याल ती पार पडू. तोंडी सांगून सर्वसामान्यांचे सरकार होत नाही, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे स्वत:हून माणसे आल्याचे हात उंचावून वारंवार सांगत होते. मग स्वत:हून आलेली निम्मी माणसं मध्येच का निघून गेली, निम्म्या खूर्च्या रिकाम्या का झाल्या? असा सवालही त्यांनी केला. 

तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? 

दोन वर्ष कोरोनाने अडचणी होत्या, निधीला अडचणी होत्या. आम्ही आमदारांचा निधी 5 कोटी निधी केला. कोणताही भेदभाव केला नाही. मंजूर केलेली कामं यांनी थांबवली, तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? भाजपच्या आमदारांना निधी देणार बाकीच्यांना नाही? थोडं उण्णीस बीस होईल, पण सत्ताधारी आमदारांना 50 कोटी दिले, तर 25 कोटी विरोधी आमदाराला दिले पाहिजेत. कारण तो साडे तीन ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. ताम्रपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही, एकनाथ शिंदे कायमचे बसायला आलेले नाहीत, 145 आकडा गेला की बाजूला व्हावं लागेल. 

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोना संकट आले. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काडण्याचं काम केलं. सगळ्याचे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करत नाही, याचा विसर पडू देता कामा नये. संकट असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबू दिला नाही. राज्यावर कर्ज वाढू दिलं नाही. राज्य व्यवस्थित पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. विचारधारा वेगळी होती, पण मतभेदाचे प्रश्न वेगळे ठेवले. आता ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget