एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Bribery Cases : कोल्हापूर जिल्हा लाचखोरांनी अक्षरश: पोखरला! खाकी वर्दी ते ग्रामपंचापत सदस्यांपर्यंत हात बरबटले, बांधलेल्या शौचालयातही कमिशनची 'लालसा' सुटेना

टेबलाखालून घेतल्याशिवाय कामच करायचं नाही किंवा धमकावून लाखो रुपये गोळा करून एका रात्रीत मोठं व्हायचं असा ध्यासच कोल्हापूर जिल्ह्यातील लाचखोर प्रवृत्तींनी घेतला आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Kolhapur Crime : टेबलाखालून घेतल्याशिवाय कामच करायचं नाही किंवा धमकावून लाखो रुपये गोळा करून एका रात्रीत मोठं व्हायचं असा ध्यासच कोल्हापूर जिल्ह्यातील लाचखोर प्रवृत्तींनी घेतला आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाचखोरांचा आकडा पाहून खाबूगिरीचा भस्म्या रोगच यांना जडला आहे का? असाही प्रश्न पडतो. चालू वर्षामध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 20 कारवायांमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडत अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये खाकी सुद्धा अपवाद राहिलेली नाही. मागील 15 दिवसांत लाचखोरीच्या तीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत. 

रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांमध्ये प्रमुख कारवाईमध्ये चालू वर्षात तीन पोलिस काॅन्स्टेबल, दोन पोलिस नाईक यांचा समावेश आहे. दोन जीएसटी अधिकाऱ्यांनाही सीबीआयने अटक केली. त्याचबरोबर, आरोग्य उपसंचालक, ग्रामसेवक, अभियंता, सहाय्यक लेखाधिकारी पदांवरील खादाड्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीत कारवाई झाली आहे. बेंबीच्या देठापासून भ्रष्टाचार संपला म्हणून आरोळी देणाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील लाचखोरांचा प्रताप आणि त्यांनी केलेली मागणी पाहिल्यास चक्कर आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. तब्बल 25 लाख रुपयांची लाच मागितल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. यावरून लाच मागणाऱ्यांची मजल लक्षात येते. 

दुर्दैवाची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात उच्च पदावरील महिला अधिकाऱ्यांची सुद्धा लाचगिरीची लालसा सुटलेली नाही. कधी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, कधी बांधलेल्या आरसीसी गटार आणि संडासमध्ये कमिशनची लालसा, कधी निवृत्तीवेतन मंजूर करून देण्यासाठी कमिशन, तर कधी प्लंबरला नळ कनेक्शन मंजूर देण्यासाठी लाचेची मागणी, तर कधी शेतकऱ्याकडे जमिनीचा निवाडा करून देण्यासाठी पोलिसानेच मागितलेली लाच यामुळे सर्वसामान्यांची मान शरमेने खाली गेली आहे. शासनाकडून वेतनासह सर्व काही वेळेवर मिळत असताना यांचे भीकेचे डोहाळे कमी कसे होत नसतील? असाच प्रश्न जगण्याशी संघर्ष करत असलेल्या सर्वसामान्यांना पडला आहे. 

कोल्हापूरच्या पोलिस दलातील लाचखोर पोलिसांनी खाकीलाच डाग लावला 

कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 20 कारवायांमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली. यामध्ये सर्वांत मोठी कारवाई जानेवारी महिन्यात करण्यात आली. मोका लावून अटक करण्याची धमकी देणाऱ्या दोन काॅन्स्टेबलना अटक करण्यात आली होती. काॅन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडेने 25 लाखांची मागणी करून 10 लाख स्वीकारताना कारवाई करण्यात आली होती, असेही आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. लालसा संपत नसल्याने अशा प्रकारची कृत्ये होत असल्याचे ते म्हणाले.  

दुसरीकडे जानेवारी महिन्यामध्येच नागाळा पार्कातील बांधकाम व्यावसायिकाकडून 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी काॅन्स्टेबलला अटक करण्यात आली होती. गेल्यावर्षी सहा काॅन्स्टेबलना लाच प्रकरणात कारवाई झाल्यानंतर बडतर्फ करण्यात आले होते. चालू वर्षीही पोलिस दलातील लाचखोरांचा पराक्रम सुरुच आहे. 

पोलिस नाईकाने शेतकऱ्याकडे मागितली कोटींची लाच

कोल्हापूर पोलिसमधून निलंबित करण्यात आलेल्या निलंबित पोलिस नाईक जॉन विलास तिवडे याने पुणे जिल्ह्यातील देहू रोड येथील शेतकऱ्याकडे शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी तब्बल एक कोटींची लाच मागितली. जॉनला सांगली पोलिसांनी मिरजेतून ताब्यात घेत अटकेची कारवाई ऑगस्ट महिन्यात केली होती. 

तिवडे याने यापूर्वी सुद्धा खाकीला डाग लावण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तो फरारच होता.याच प्रकरणात सांगली पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस नाईक जॉनविरोधात कोल्हापूरच्या शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जॉन हा  जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक आहे.  

पोलिस नाईकला दोन हजारांची लाच घेताना पडकले

हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नामदेव औदुंबर कचरे यालाही लाचलुचपत प्रतिबंध पथकाने 2 सप्टेबर रोजी दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदतीच्या बदल्यात 2 हजारांच्या लाचेची मागणी नामदेव कचरे यांनी केली होती. 

लाच घेताना जीएसटीचे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

जीएसटी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना 50 हजार रूपयांची लाच घेताना सीबीआयने पकडले होते. अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असतानाच लाच मागण्याचा प्रताप 

कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात 11 ऑगस्टला आरोग्य उपसंचालक असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेपैकी 90 टक्के रक्कम मंजुरीसाठी 10 टक्के कमिनशन मागितले होते. तडजोडीअंती 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर त्यांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. 

फंडाची रक्कम मंजूर करण्यासाठी 23 हजारांची लाच 

सहायक शिक्षकाचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून घेण्यासाठी 23 हजारांची लाच मागितल्याचे समोर आले. उत्तम बळवंत कांबळे असे त्याचे नाव आहे. 

प्लंबरकडून लाच घेताना कनिष्ठ अभियंता सापडला 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र हुजरे यांना प्लंबरकडून दोन कनेक्शन मंजूर करण्याच्या बदल्यात 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. 

शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन!

बांधलेल्या शौचालयांचे बिल मंजूर करण्यासाठी 10 कमिशनने लाच मागणाऱ्या करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली. ग्रामसेवक महादेव गणपती डोंगळे व ग्रामपंचायत सदस्य धनाजी भारती पाटील यांचेविरूध्द करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पन्हाळा पंचायत समितीमधील सहाय्यक लेखाधिकारी 

रस्ते आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कार्यवाहीसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑक्टोबरला सापळा रचून रंगेहाथ पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर असे त्याचे नाव आहे. 

कोल्हापूरच्या दहावी पास रियाजचा असाही कारनामा!

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील अवघ्या दहावी पास रियाज अल्लाबक्ष शेखने आमदारांना मंत्रिपदासाठी 100 कोटींचा चुना लावण्याचा बेत रचला होता. मात्र, हा बनाव उघडकीस आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.  रियाजने मोठा डाव एका दमात साध्य करण्याच्या इराद्याने थेट आमदारांना गंडवण्याचा बेत रचला, पण त्याचा डाव अंगलट आल्याने बेड्या पडल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Embed widget