एक्स्प्लोर

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी

एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही... 

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?

आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! 

असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 November 2026 : आजचा सोमवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक स्थिती बदलणार; आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक स्थिती बदलणार; आजचे राशीभविष्य
Mumbai Diwali Fire Incidents : दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
दिवाळीच्या आतषबाजीमुळे मुंबई, ठाण्यात आगीचे तांडव, डोंगरीत भीषण आग, चेंबूर अन् ठाण्यातही इमारतींना पेट
Gokul : गोकुळची लढाई कोल्हापूरच्या स्वाभिमानाची नाही, तर लोकशाही आणि सहकार चळवळीच्या अस्तित्वाची, पृथ्वीराज चव्हाण यांचं लोकशाहीवादी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
लोकशाही मार्गाने बहुमत मिळवलेल्या पॅनेलला बाजूला सारून लोकशाहीची हत्या केली जातेय : पृथ्वीराज चव्हाण 
Tilak Varma Birthday : फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget