Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Pune BJP : 2017 मध्ये काहीच मतांनी पराजय झालेल्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

पुणे: पुण्यात भाजपला (Pune BJP) उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार असल्याचं दिसून येत आहे.165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 2017 मध्ये काहीच मतांनी पराजय झालेल्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपने (Pune BJP) कंबर कसली आहे.(Pune BJP)
पुण्यात भाजपचा उमेदवार (Pune BJP) देण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. कारण भाजपकडून 2500 इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. आजपासून या 2500 उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील भाजपच्या कार्यालयात पार पडणार आहे. पुण्यातील 41 प्रभागांसाठी या सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखतील घेतल्या जाणार आहे. आज आणि उद्या (शनिवरी, ता १३ आणि रविवारी, ता १४) या उमेदवारांच्या मुलाखती होतील. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले हे तिघे आज मुलाखती घेणार आहे. तिघांकडेही प्रत्येकी विधानसभा मतदार संघ वाटून दिलेले आहे. (Pune BJP)
धीरज घाटे यांच्याकडे तीन, गणेश बीडकर यांच्याकडे तीन आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे दोन अशा पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यात त्या-त्या प्रभागातील माहिती, उमेदवारांची इच्छाशक्ती, आधी केलेली काम आणि सामाजिक वर्चस्व पाहून उमेदवारी देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील तीन दिवस भाजप कार्यालयात प्रत्येक प्रभागासाठी मॅरॅथॉन बैठका घेण्यात आल्या. त्यात सामाजिक स्थिती, मतदारांचा कल, भौगोलिक स्थिती, 2017 च्या निवडणुकीच्या वेळची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर या सगळ्यांची नोंद करुन त्याचा ड्राफ्ट भाजपकडून तयार करण्यात आला आहे. आता भाजपची उमेदवारी खेचून आणण्यासाठी इच्छूकांसाठी काही प्रमाणात कठीण असल्याच्या चर्चा आहे. पुण्यात 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक होते. त्या आता शिवसेनेच्या 5 उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. तर भाजप आजा 125 नगरसेवक निवडूण आणण्याच्या तयारीत आहे. 2017 मध्ये काहीच मतांनी पराजय झालेल्यांना पुन्हा संधी देण्याच्या तयारीत देखील भाजप दिसत आहे.
Pune BJP : निवडणुकीच्या आधी भाजपचा जंबो प्लान
पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जंबो प्लॅन समोर आला आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ हजार कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ करणार आहेत. आचारसंहिता लागण्याआधी उद्घाटन करून कामाला सुरुवात होणार आहे. सोमवारी पुण्यात भाजपने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात एकाच ठिकाणी कामाच उद्घाटन होणार आहे.
स्थायी समितीने जवळपास ३९० कोटीच्या कामाला मंजुरी दिली आहे. आचारसंहिता लागण्याआधी भाजपाचा कामाचा धडाका सुरू होणार आहे.
Pune BJP : पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सैनिकांचं ठरलं
पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या सैनिकांचं ठरलं आहे. शिवसेना आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्याची तयारी दर्शवलेली आहे. दोन्ही बंधू एकत्र आलेत, आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे, असा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येतायेत, याचाच आम्हाला खूप आनंद झालाय. त्यामुळं जागा वाटपात आम्ही कोणतीही आढेवेढे घेणार नाही. आत्तापर्यंत आमच्या तीन वेळा बैठका ही झाल्यात. आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकासआघाडी करण्याची चर्चा सुरु आहे. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढाईची संपूर्ण तयारी केली आहे. आता आम्ही फक्त ठाकरे बंधूंच्या आदेशाची वाट पाहतोय, असं म्हणत चाबुकस्वार आणि चिखले यांनी युतीवर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट केलं.























