IND vs SA 3rd T20 : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Team India Playing XI 3rd T20 vs South Africa : पहिल्या टी-20 सामन्यात शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात तो खातेही न उघडता शून्यावर तंबूत परतला.

IND vs SA 3rd T20 Team India Playing XI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 11 डिसेंबर रोजी न्यू चंदीगड येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. 213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 162 धावांवर सर्वबाद झाला. धक्कादायक बाब म्हणजे भारताला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर चाहत्यांनी विशेषतः शुभमन गिलच्या फॉर्मवर जोरदार टीका सुरू केली आहे.
सलग दोन सामन्यांत अपयशी ठरलेला शुभमन गिल
या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात तो खातेही न उघडता शून्यावर तंबूत परतला. त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. आकडेवारी पाहिली तर गिलची टी-20 मधील अलीकडची कामगिरीही निराशाजनक आहे. मागील 14 टी-20 डावांत त्याने केवळ 263 धावा केल्या असून त्यातील सर्वोच्च धावसंख्या फक्त 47 इतकीच आहे.
टी-20 संघात संजू सॅमसनची एन्ट्री होणार का?
एका बाजूला शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरत असताना, दुसऱ्या बाजूला चाहत्यांकडून संजू सॅमसनला टी-20 संघात सलामीवीर म्हणून संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. संजू सॅमसनने गेल्या एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल तीन शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर तीन अर्धशतकेही आहेत. गिलच्या तुलनेत संजूचा रनरेट आणि सरासरी दोन्हीही अधिक प्रभावी ठरले आहेत.
सोशल मीडियावर शुभमन गिलवर टीकेची झोड
टी-20 मधील खराब फॉर्ममुळे शुभमन गिल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. ‘एक्स’ (आधीच ट्विटर) वर एका युजरने खोचकपणे लिहिले, “इंडियाचा सर्वात मोठा खेळाडू, गौतमचा लाडक्याचा आणखी एक डक!” इतकेच नाही तर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण यांनीही शुभमन गिलसह कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत संघाच्या फलंदाजीवर चिंता व्यक्त केली आहे.
तिसऱ्या T20I साठी भारताची Playing XI
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन/शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -





















