एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक, पाणीही घोटेना; महंतांनी आग्रहानं पाणी पाजलं

Manoj Jarange Patil Health Update : आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी पाणी पाजलं. जरांगेंची प्रकृती अतिशय नाजूक आहे.

Manoj Jarange Patil Health Update : आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती अतिशय नाजूक (Manoj Jarange Patil Health News) असल्याची चिंताजनक बाब आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक

मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 'पाणी घ्या' म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.

जरांगे पाटलांना ग्लानी आली

सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आणखी (Health Updates) बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. यासोबतच त्यांना पोटदुखीचाही त्रास (Stomach Pain) होत आहे. गुरुवारी (15 फेब्रुवारी) सकाळपासून मनोज जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली आणि अशक्तपणामुळे त्यांना ग्लानीही आली. जरांगे पाटीलांची तब्येत बिघडत चालल्याने महिलांची रडारड सुरु आहे. जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत, 'पाणी घ्या' म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंची भूमिका ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात व्हावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठीच जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरुच असल्याने जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगेंना पोटदुखीचा त्रास होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget