एक्स्प्लोर

Jalgaon News : नगरविकास खात्याकडूनही भुसावळ नगरपरिषदेतील दहा नगरसेवक अपात्र, राष्ट्रवादीसह खडसे गटाला धक्का

Jalgaon News : भुसावळ नगरपालिकेतील तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय नगरविकास खात्याने कायम ठेवल्याने राष्ट्रवादीसह खडसे गटाला हा धक्का मानला जात आहे.

Jalgaon News : भाजपच्या (BJP) तिकीटावर निवडून आल्यानंतर राजीनामा न देता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या भुसावळ (Bhusawal) नगरपालिकेतील तत्कालीन नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना नगरविकास खात्यानेही अपात्र ठरवलं आहे. नगरविकास खात्याचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससह एकनाथ खडसे यांनाही धक्का समजला जात आहे. नगरसेवकांच्या या गटाला आता केवळ खंडपीठात याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

भुसावळ  नगरपालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवार, 18 जुलै 2020 रोजी एका टर्मसाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवलं होतं. अपात्र नगरसेवकांतर्फे या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका देखील 18 ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आल्याने या नगरसेवकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब धक्कादायक समजली जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?
भुसावळ नगरपालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले मात्र त्यांनी 29 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 17 डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपातून बाहेर पडताना राजीनामा न दिल्याने भाजपाच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 29 डिसेंबर रोजी याचिका दाखल झाल्यानंतर त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवलं होतं. यावर आता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अंतिम सुनावणीनंतर माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना एका टर्मसाठी निलंबित केल्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.

खंडपीठात दाद मागणार : एकनाथ  खडसे
नगरविकास विभागाच्या निर्णयाविरोधात खंडपीठात दाद मागण्यात येईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. हा निर्णय सरकारकडून अपेक्षितच होता, त्यामुळे आधीच आम्ही अपील केलं होतं, असंही खडसे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget