(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय सांगता?; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; चक्क उन्हामुळे 144 कलम लागू, नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेने किंवा फर्मने आपल्या कामगारांना उन्हात काम करण्यास बाध्य करू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आला आहेत
जळगाव: राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून विदर्भासह खान्देशात तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याची माहिती असून उष्णतेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील गावात 100 पेक्षा जास्त शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, उष्णतेच्या लाटेचा (summer) सामना करण्यासाठी आता प्रशासनही सज्ज झालं आहे. जिल्ह्यात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, तसेच उन्हात काम करण्याची वेळ कुठल्याही कामगारांवर येऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाच्या अनुषंगाने सविस्तर स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेने किंवा फर्मने आपल्या कामगारांना उन्हात काम करण्यास बाध्य करू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आला आहेत. मात्र, या 144 कलमाचा अर्थ जमावबंदी अथवा लॉकडाऊन अशा अर्थाने काहीजण लावत आहेत , तो तसा लावण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात माहिती देताना प्रसाद म्हणाले की, सध्या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यामुळे, अशा काळात नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मुलांचे, महिलांचे आणि कामगारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, त्यांना कोणीही उन्हात काम करण्यास बाध्य करू नये आणि तसे कोणी करत असेल तर 144 या कलमान्वये संबधित व्यक्ती देखील त्या संस्थेविरोधात तक्रार करू शकते, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. तसेच, अशा प्रकारची तक्रार कोणी केल्यास संबंधित सरकारी यंत्रणांकडे या संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार कलमान्वये आहेत. मात्र, याचा अर्थ कोणीही जमाव बंदी लावण्यात आली किंवा लॉकडाऊन करण्यात आले आहे, असा काढू नये. त्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकते, असे स्पष्टीकरणही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जळगाव अपघातीतील तिसऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
जळगाव जिल्ह्यात रामदेव वादी येथे कार आणि दुचाकी अपघातामध्ये चार जणांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताली कारचालकासह कारमधील एकास काल पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर ध्रुव सोनावणे या तिसऱ्या कार मधे बसलेल्या संशयित आरोपीस देखील पोलिसांनी आज अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी, न्यायालयाने उर्वरित दोन आरोपींप्रमाणेच ध्रुव सोनावणे यासदेखील 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा
जळगावमध्ये उन्हाचा कहर; मुक्या जीवांना त्रास, 100 मेंढ्या दगावल्या; आमदाराने घेतली धाव