एक्स्प्लोर
बचाव पथकाने सोडलेला दोर तरुणाच्या हाती आला, पण...

बारां (राजस्थान): राजस्थानमध्ये निसर्गाच्या रौद्र रुपाने एका तरुणाचा बळी घेतला आहे. बारां जिल्ह्यात घडावली नदीच्या तुफानी प्रवाहात एक तरुण अडकला होता. पण बचावकार्याच्या अथक प्रयत्नानंतरही तो तरुण वाचला नाही. पावसामुळे राजस्थानमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच एक तरुण घडावली नदीवर बांधलेल्या पुलाखाडी अडकला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. तरुणाला वाचवण्यासाठी बचाव पथकाने एक दोर सोडला. हा जगण्याच्या आशेने त्या तरुणाने हा दोर पकडला. तरुण वाचणार असं उपस्थितांना वाटलं खरं, मात्र नदीच्या प्रवाहासमोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या हातातून दोर सुटला आणि बघता बघता तरुण पाण्यात वाहून गेला. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























