एक्स्प्लोर
येडियुरप्पा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देण्याची चिन्हं, 13 पानी भाषण तयार
कर्नाटक बहुमत चाचणी: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज चार वाजेपर्यंत बहुमताचा आकडा जमवता आला नाही तर येडियुरप्पा राजीनामा देऊ शकतात, असं वृत्त टीव्ही 9 कन्नड या वृत्तवाहिनीने दिलंय.

बंगळुरू: कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील प्रमुख वृत्तवाहिनी टीव्ही 9 कन्नडने याबाबतचं वृत्त दिलं. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता आलं नाही तर येडियुरप्पा राजीनामा देतील असं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहतील, तेव्हा करावयाचं 13 पानाचं भाषण तयार असल्याचंही टीव्ही 9 कन्नडच्या वृत्तात म्हटलंय. बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनाही कल्पना दिल्याचं वृत्त आहे. आता बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपकडे स्वत:चं 104 आमदारांचं संख्याबळ आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 112 हा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी आज दुपारी 4 पर्यंत त्याबाबतची तजवीज करायची आहे. दरम्यान, आज सकाळपासून कर्नाटक विधानसभेत आमदारांचे शपथविधी पार पडले. येडियुरप्पांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेलवर दोन आमदारांना डांबून ठेवलं, असा आरोप काँग्रेसने केला. याशिवाय काँग्रेसने येडियुरप्पा काँग्रेस आमदाराशी सेटलमेंट करत असल्याची ऑडिओ क्लिपही जारी केली आहे. या सर्व प्रकारानंतर आता कर्नाटक विधानसभेत काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्या
येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, दुपारी 4 वाजता बहुमत चाचणी
...तेव्हा 7 दिवसातच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपद गमावलं होतं!
बहुमत चाचणी म्हणजे काय? मतदान कसं होणार?
कर्नाटक बहुमत चाचणी : 2 आमदारांना येडियुरप्पांच्या मुलाने डांबलं, काँग्रेसचा आरोप
भाजपच्या या खेळीने जेडीएस-काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगणार?
आणखी वाचा























