Covid19 Rate Hike : चिंताजनक! कोरोना आलेख वाढताच, देशात आठवड्याभरात संक्रमणात 72 टक्क्यांची वाढ
Weekly Covid19 Rate Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे
Weekly Covid19 Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.
देशात 04 जून 2022 ते 10 जून 2022 या दरम्यान 40 हजार 888 रुग्ण होते. हा आकडा 11 जून 2022 ते 17 जून 2022 या दरम्यान 70 हजार 358 वर पोहोचला. यामुळे आधीच्या आठवड्याच्या तुलनेत गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 72 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
Weekly India Covid19 Trend graph shows a clear silent surge ,watch hospitalisation and protect the vulnerable. SAVE every life 🙏 pic.twitter.com/pBuhfSuvfo
— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) June 19, 2022
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
देशातील सवार्धिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 23 हजार 153 रुग्ण होते, त्याआधीच्या आठवड्यात रुग्णांची संख्या 14 हजार 363 होती. राज्यातील रुग्ण संख्येत आठवड्याभरात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रुग्णसंख्येत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाबाधितांमध्ये 136 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 04 जून 2022 ते 10 जून 2022 या दरम्यान 3 हजार 286 रुग्ण होते. हा आकडा 11 जून 2022 ते 17 जून 2022 या दरम्यान रुग्णांची संख्या 7 हजार 757 वर पोहोचली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bharat Biotech : लवकरच येणार नेझल कोरोना वॅक्सिन, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण
- Coronavirus : दिल्ली-महाराष्ट्राने देशाचं टेन्शन वाढवले, कोरोना रुग्णांचा विस्फोट
- स्वत:च्याच लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; आमदार म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )