एक्स्प्लोर

Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित

Waqf Bill JPC Meeting : खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड संदर्भात JPC समिती स्थापन केली आहे. मात्र, विक्षिप्त पद्धतीने समिती चालली आहे.

नवी दिल्लीवक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर संयुक्त संसदीय समितीची (JPC) बैठक दिल्लीत सुरू आहे. सकाळी अकरा वाजता सभा सुरू झाल्यानंतर गदारोळ सुरू झाला. मसुद्यात प्रस्तावित केलेल्या बदलांवर संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. ही समिती आज काश्मीरचे धार्मिक प्रमुख मीरवाइज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आहे. मीरवाईज यांना बोलावण्यापूर्वी समिती सदस्यांमध्ये वादावादी झाली. वादावादी आणि गदारोळामुळे बैठक काही काळ थांबवावी लागली. दिल्ली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा भाजप आग्रह धरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, समितीची कार्यवाही एक फार्स आहे. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेस सदस्य नसीर हुसैन उठून बाहेर गेले. समितीने विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले आहे.

मनाप्रमाणे कारभार सुरू, आम्ही गुलाम आहोत, असं वागवतात

खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड संदर्भात JPC समिती स्थापन केली आहे. मात्र, विक्षिप्त पद्धतीने समिती चालली आहे. 21 तारखेच्या बैठकीत सांगितल जातं की 4 वाजेपर्यंत तुमच्या सूचना द्या. जाणीवपूर्वक वेळ दिला जात नाही मतदारसंघातील कार्यक्रम सोडून आम्ही इथे पोहोचलो. विमानात बसल्यावर सांगतात की क्लॉक बाय क्लॉक बैठक होणार नाही. आज अचानक सांगितलं की उद्याची बैठक रद्द केली आहे, आता म्हणत आहेत 27 तारखेला बैठक होईल.  आम्ही विनंती केली की 31 तारखेला ही बैठक घ्या किंवा 13 फेब्रुवारीनंतर बैठक घ्या, पण आमची विनंती धुडकावून लावली.  मनाप्रमाणे तुमचा कारभार सुरू आहे, आम्ही गुलाम आहोत अस वागवतात. निशिकांत दुबे हे खोट्यांचे वकील आहेत काहीही मुद्दे मांडले की चेअरमनने उत्तर देण्याऐवजी निशिकांत दुबे उत्तर देतात.मुस्लिम धार्जिणे आम्हाला म्हणता मग कशाला अजमेरला चादरी चढवायला जाता, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टीएमसी खासदार म्हणाले, बैठकीची वेळ बदलली पाहिजे

कामकाजातून बाहेर आलेले टीएमसी खासदार कल्याण यांनी 27 जानेवारीला होणारी बैठक 30 जानेवारी किंवा 31 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी विरोधी सदस्यांवर टीका करत त्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरोधात असून ते बहुमताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. लखनऊमध्ये झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितले की, जेपीसीची शेवटची बैठक 24 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर 31 जानेवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल संसदेत मांडला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सदुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Embed widget