एक्स्प्लोर

Vistara Airlines : एकाच वेळी रनवेवर समोरासमोर आली दोन विमानं, महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले 500 प्रवाशांचे प्राण

Vistara Airlines : दिल्ली विमानतळावर एकाच रनवेवर विस्तारा एअरलाइन्सची दोन विमानं अगदी समोरासमोर आली. यावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

दिल्ली : दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) बुधवारी (23 ऑगस्ट) रोजी एक मोठी दुर्घटना टळली आहे. एकाच रनवेवर विस्तारा एअरलाइन्सची (Vistara Airlines) दोन विमानं एकत्र पोहचली. यामध्ये एक अहमदाबादवरुन दिल्लीला आलेलं एक विमान होतं आणि एक दिल्लीवरुन बागडोगराला जाणारं विमान होतं. यावेळी अहमदाबादवरुन येणाऱ्या विमानातील एका महिला पायलटच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

नेमकं काय घडलं?

अहमदाबादवरुन येणारं दिल्ली विमानतळावर लँड होणार होतं. पण त्या विमानाची पायलट असलेल्या महिलेने त्याच रनवेवरुन दुसरं विमान टेक ऑफ होताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगचेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबद्दल माहिती दिली.  त्यामुळे एक मोठा अपघात होण्यापासून टळला आहे. या दोन्ही विमानांमध्ये 500 पेक्षा अधिक प्रवासी होते.

याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीए या प्रकरणात सखोल चौकशी करणार आहे. तसेच याप्रकरणी संबंधित हवाई वाहतूक नियंत्रकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं की, 'विस्तारा एअरलाइन्सचे अहमदाबादवरुन दिल्लीला जाणारे वीटीआय 926 या विमानाचा या घटनेमध्ये समावेश होता. हे विमा रनवे 29 वर उतरलं. पण वाहतूक नियंत्रण कक्षाने त्यांना रनवे 29 आर पार करण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी नियंत्रण कक्षाने त्याच रनवे वरुन विस्ताराची वीटीआय 725 या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली.' 

डीजीसीएनं काय म्हटलं?

डीजीसाएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, 'त्याच रनवे वरुन दोन्ही विमानं लँड आणि टेक ऑफ करणार आहेत हे नियंत्रण कक्षाला काही क्षणांसाठी लक्षात आलं नाही. त्यामुळे त्यांनी विस्ताराच्या दुसऱ्या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली. परंतु ज्या क्षणी महिला पायलटने वाहतूक नियंत्रण कक्षाला सतर्क केले त्याच क्षणी या विमानाचे टेक ऑफ रद्द करण्यात आले.' दरम्यान या प्रकरणी विस्तारा एअरलाइन्सकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

तर डीजीसीए या प्रकणात आणखी तपास करत आहेत. कोणंतही विमान लँड होण्यापूर्वी आणि टेक ऑफ करण्यापूर्वी हवाई नियंत्रण कक्षाची परवानगी घेतं. जर हवाई नियंत्रण कक्षाने परवानगी दिली तरच ते विमान त्या विमानतळावर टेक ऑफ आणि लँड करु शकतं. त्यामुळे यामध्ये हवाई नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. या प्रकरणात हवाई नियंत्रण कक्षाच्याच हे लक्षात न आल्यानं या रनवेवर मोठा अपघात झाला असता. पण महिला पायलटच्या प्रसंगावधनामुळे हा अपघात टळला. 

हेही वाचा : 

Russia Plane Crash : रशियात विमान कोसळले, वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांच्यासह 10 जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget