एक्स्प्लोर

पोस्टमॉर्टमचे 600 द्या, वाराणसी पूल दुर्घटनेनंतर लज्जास्पद प्रकार

मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या नराधमांनी वाराणसी पूल दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांकडून चक्क तीनशे ते सहाशे रुपयांची मागणी केली.

लखनौ : उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत पूल कोसळून काल 18 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. डोळ्यांनी बघवणार नाही असं चित्र काल वाराणसीत होतं. पूलाच्या कोसळलेल्या पिलरच्या खाली अनेक गाड्या आणि परिणामी लोकही चिरडले गेले. मात्र त्याहूनही भयानक प्रकार घडल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे, जो पाहून कोणाचाही माणुसकीवरचा विश्वासच उडेल. 'एका पोस्टमॉर्टमसाठी 600 रुपये द्या' अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडे होत असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामुळे वाराणसीतील आरोग्य विभागाचे धिंडवडे उडाले आहेत. केंट रेल्वे स्टेशनजवळ पूल कोसळून 18 निष्पापांचा बळी गेला. पण मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या नराधमांनी शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांकडून चक्क तीनशे ते सहाशे रुपयांची मागणी केली. कोणीतरी एकाचवेळी आपल्या कुटुंबातल्या पाच जणांना गमावून बसलं होतं, कोणी बाहेरगावाहून आलं होतं, तर कोणाचं पाकीटच हरवलं होतं. मात्र जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी उचलणार नाही, अशी संतापजनक उत्तरं माणसाची फक्त कातडी चढवलेल्या या जनावरांनी दिली. घटनेनंतर प्रशासनानं कर्मचाऱ्याला निलंबित करत गुन्हा दाखल करण्याच सौजन्य दाखवलं. मात्र लोकांना अशा अवस्थेत खिंडीत गाठून, त्यांच्या भावनांशी इतक्या क्रूरपणे खेळणाऱ्यांना निलंबित करुन कुटुंबीयांना न्याय मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget