Vaishno Devi : वैष्णोदेवी मंदिरात जाणाऱ्या भाविकांना केलं जाईल ट्रॅक, RFID कार्डची सुविधा दिली जाणार
Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी (Vaishno Devi Temple) मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेडिओ-फ्रिक्वेंसी आधारित ओळखपत्र सुरू करण्यात आले आहे.
Vaishno Devi Temple: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या वैष्णोदेवी (Vaishno Devi Temple) मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेडिओ-फ्रिक्वेंसी आधारित ओळखपत्र सुरू करण्यात आले आहे. रविवारी देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन सिस्टम (RFID) वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्याची ट्रॅकिंग रेडिओ लहरींद्वारे केली जाऊ शकतो.
भाविकांच्या हालचालीवर राहणार नजर
श्री माता वैष्णोदेवी देवस्थान समिती म्हणजेच श्राइन बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "गेल्या आठवड्यात बालगंगा आणि ताराकोट ते गुहा मंदिरापर्यंत भाविकांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहे." या प्रणालीमुळे श्राइन बोर्डाला त्यांच्या क्षमतेनुसार भाविकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत होईल.
लवकरच पूर्ण सुविधा मिळेल
अधिकाऱ्याने सांगितले की, यात्रेकरूंवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरते, विशेषत: जे लोक गर्दीत हरवतात किंवा त्यांच्या कुटुंब/समूहापासून वेगळे होतात. लवकरच संपूर्ण RFID सुविधा सुरू केली जाईल. त्याची चाचणी सुरू असून येत्या आठवडाभरात त्याची पूर्ण अंमलबजावणी होईल.
भाविकांना करणार ट्रॅक
ते म्हणाले की, बेस कॅम्प कटरा ते भवन या 13 किमी लांबीच्या प्रवासादरम्यान आरएफआयडी कार्ड असलेल्या भाविकांना ट्रॅक केले जाऊ शकते, यामुळे प्रवासी सुविधा संस्थांसाठीही वरदान ठरेल. याबाबत उल्लेखनीय बाब अशी आहे की, दररोज 20 हजार ते 25 हजार भाविक मातेच्या (वैष्णो देवी) मंदिरात दर्शनासाठी कटरा बेस कॅम्पवर पोहोचत आहेत.
माता वैष्णोदेवीची यात्रा पुन्हा सुरू
गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता माता वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरच्या श्राइन बोर्डाने म्हणजेच देवस्थान समितीने भाविकांना खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा तुर्तास स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. शनिवारी, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटरा शहरातील माता वैष्णो देवी मंदिराजवळ, मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. या ठिकाणी आलेल्या पुरामुळे हा दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा ही यात्रा सुरू करण्यात आली होती. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली होती. आपण सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले होते. सीईओ अंशुल गर्ग यांनी सांगितले होते की, प्रवासाच्या मार्गावर पाणी नव्हते. मात्र, खबरदारी म्हणून कटरा ते भवन हा प्रवास थांबवण्यात आला होता.
संबंधित बातम्या
Vaishno Devi Yatra : माता वैष्णोदेवी यात्रा तुर्तास स्थगित, दर्शनावर बंदी, देवस्थान समितीचा निर्णय
Railway News : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वेने सुरू केल्या 'या' विशेष गाड्या