एक्स्प्लोर

Uttarkashi Tunnel Collapse : 14 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात अडकलेले, बचावकार्य अंतिम टप्प्यात; कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील बोगद्या दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याच्या मोहिमेचा आज 14 वा दिवस आहे. अजून 10 मीटर ड्रिलिंग बाकी आहे.

Uttarakhand Rescue Operation : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील (Uttarkashi) बोगद्यात गेल्या 14 दिवसांपासून 41 कामगार अडकले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज संध्याकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं जातं आहे. बचावकार्य शेवटच्या टप्प्यात आहे. बोगद्यात 10 पाईप टाकण्यात आले आहेत आणि या पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात येईल. दरम्यान कामगारांची सुटका करण्याच्या आधी एनडीआरएफच्या टीमने बोगद्यात एनडीआरएफने मॉकड्रिल केलं आहे.

Uttarkashi Tunnel Accident : 14 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात

उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या 14 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात अडकले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बोगद्यामध्ये माती कोसळली आणि कामगार आतमध्ये अडकले आहेत. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीचं रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र, खोदकाम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे बचावकार्य पुन्हा थांबवण्यात आलं आहे. 

Uttarkashi Tunnel Accident : आणखी दहा मीटर ड्रिलिंग बाकी

आयएएनएस वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी 24 नोव्हेंबरला रात्री 47 मीटर अंतरावर ड्रिलिंगचं काम थांबवावं लागलं. बोगद्यात पाईप टाकले जात आहेत. एचआयडीसीएलचे महाव्यवस्थापक कर्नल दीपक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिनसमोर वारंवार लोखंडी वस्तू येत असल्याने ड्रिलिंगच्या कामात अडथळे येत असून बचावकार्यावर परिणाम होत आहे. आतापर्यंत 47 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं आहे. आणखी दहा मीटर ड्रिलिंग बाकी आहे.

Uttarkashi Tunnel Accident : पाईपद्वारे ऑक्सिजन, वीज आणि अन्न पुरवठा

12 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी पहाटे 5.30 च्या सुमारास सिल्क्यरा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळला, 41 कामगार अडकले. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आणि कॉम्प्रेसरचा दाब निर्माण करून पाईपद्वारे अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन, वीज आणि अन्नपदार्थ पुरवले जात आहेत.

Uttarkashi Tunnel Accident : विविध एजन्सी बचाव कार्यात गुंतलेल्या

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत. लवकरच या कामगारांना बाहेर काढण्यात यश येईल.

Uttarkashi Tunnel Accident  : कामगारांना बाहेर काढण्यासाठीचा प्लॅन

बोगद्याच्या आज कोसळलेल्या भागात जमा झालेला ढिगारा काढणं शक्य नव्हतं. त्यातच वरून सुरू असलेल्या भूस्खलनामुळे बचावकार्य कठीण झालं. यामुळे, 30 मीटर परिसरात जमा झालेला मलबा 60 मीटरपर्यंत पसरला. 'शॉटक्रेटिंग'च्या साहाय्याने सैल ढिगारा मजबूत करून आणि नंतर ड्रिलिंग करून मोठ्या व्यासाची स्टील पाइपलाइन टाकून कामगारांना बाहेर काढण्याची रणनिती आखण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Embed widget