एक्स्प्लोर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना उत्तराखंड हायकोर्टाकडून अवमानना नोटीस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ही नोटीस जारी केली.बंद मंदिरावरुन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते, असं म्हटलं होतं.

देहरादून : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने अवमानप्रकरणी नोटीस पाठवली आहे. भगत सिंह कोश्यारी यांना चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. शरद कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने एका एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना ही नोटीस पाठवली आहे.

देहरादूनमधील रुरल लिटिगेटशन अॅण्ड एंटाईटेलमेंट केंद्र (रुलक) ने या प्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. माजी मुख्यमंत्री कोश्यारी यांनी जाणीवपूर्वक आदेशाचं पालन न केलं नाही, असा आरोप याचिकेत केला आहे.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मागील वर्षी म्हणजेच 3 मे 2019 माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थान तसंच इतर सुविधांची थकित रक्कम सहा महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेश दिला होता. कोर्टाच्या आदेशानंतरही भगत सिंह कोश्यारी यांनी अजूनही राज्य सरकारच्या बाजारमूल्यानुसार घरभाडं जमा केलेलं नाही, असं याचिकेत म्हटलं आहे. शिवाय त्यांनी वीज, पाणी, पेट्रोल इत्यादीचं बिलही भरलेलं नाही, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

भगत सिंह कोश्यांरीविरोधात खटला दाखल का करु नये? हायकोर्टाची विचारणा भगत सिंह कोश्यारी यांनी संबंधित रक्कम जमा न करुन कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला, असा आरोप करत रुलकनेच याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला आदेशाचं पालन का केलं नाही अशी विचारणा केली. तसंच माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात खटला दाखल का केला जाऊ नये असाही प्रश्न विचारला. त्यानंतर हायकोर्टाने कोश्यारी यांना नोटीस पाठवली आहे.

राज्यपालांना अवमानना नोटीस पाठवली जाऊ शकते? राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याविरोधात अवमानना याचिका दाखल करण्याआधी दोन महिने त्यांना याची माहिती देणं गरजेचं असतं. याचिकाकर्त्यांचे वकील कार्तिकेय हरि गुप्ता यांच्या माहितीनुसार, "ही बाब लक्षात घेऊन भगत सिंह कोश्यारी यांना 60 दिवस आधी नोटीस पाठवली होती. 10 ऑक्टोबरला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरत आपण कोर्टात याचिका दाखल केली होती. कोश्यारी यांच्यावर शासकीय निवासस्थान आणि इतर सुविधांचं 47 लाखांपेक्षा रक्कम थकित आहे."

राज्यपालांच्या पत्रावरुन जोरदार वाद राज्यातील बंद मंदिरांवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन जोरदार वाद रंगला होता. राज्यपालांनी आपल्या पक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वावरुन प्रश्न उपस्थित करुन तुम्ही सेक्युलर झालात का असा प्रश्न विचारला होता. यावर उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना उत्तर देत माझ्या हिंदुत्त्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती. तर राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोश्यारी यांच्या पत्रावर भाष्य केलं होतं.

संबंधित बातम्या

गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कसे? : शरद पवार

मुंबईला PoK म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना उत्तर

राज्यपालांचं पत्र मीडियात प्रसिद्ध होणे आणि पत्रातील भाषा वाचून धक्का बसला, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह

'राज्यपालांचं वर्तन 'आ बैल मुझे मार', मोदी, शाहांनी त्यांना माघारी बोलवावं', शिवसेनेचा हल्लाबोल

Governor vs CM Uddhav Thackeray | राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget