(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand Glacier Collapse Video | 'भागोsss', हिमकडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं
उत्तराखंडमध्ये आलेल्या या आपत्तीमुळं हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा उशारा देण्यात आला आहे. सदर घटनेनंतर अलकनंदा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Uttarakhand Glacier Collapse Video उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये रविवारी एकच दहशत पाहायला मिळाली. ही दहशत होती एका आपत्तीची. उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळं पुन्हा एकदा सारा देश हळहळला आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चमोलीमध्ये हिमकडा कोसळला. ज्यानंतर ऋषीगंगा आणि धौलीगंगां पूराखाली आल्या.
धौलीगंगावर बांधण्यात आलेला हायड्रो प्रोजेक्ट बांधही या संकटात तुटला. ज्यामध्ये या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मजुरांची पाण्याच वाहून जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय अनेक मजूर वाहून गेल्याचीही भीती वर्तवण्यात येत आहे. चमोलीपासून थेट हरिद्वारपर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेकडून सदर घटनेचे काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये घटनास्थळी असलेल्यांचा आक्रोश ऐकून धडकी भरत आहे.
Uttarahand | उत्तराखंड आपत्तीवर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
समोरून अचानकपणे वाहत येणारा पाण्याचा लोंढा पाहून क्षणार्धासाठी इथं नेमकं काय घडत आहे याचाच अंदाज अनेकांना आला नाही आणि जोवर अंदाज आला, तोवर साऱं होत्याचं नव्हतं झालं होतं. सदर घटनेनंतर अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. शिवाय गोंधळाचं वातावरणही पाहायला मिळालं.
#WATCH | A massive flood in Dhauliganga seen near Reni village, where some water body flooded and destroyed many river bankside houses due to cloudburst or breaching of reservoir. Casualties feared. Hundreds of ITBP personnel rushed for rescue: ITBP pic.twitter.com/c4vcoZztx1
— ANI (@ANI) February 7, 2021
रेणीपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावात हा हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामुळं नदी किनाऱ्यालगत असणाऱ्या सर्व गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून, अतिशय वेगानं बचावकार्याला सुरुवात झाली आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनीही बचावकार्यासाठी धाव घेत शक्य त्या सर्व परिंनी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला.