एक्स्प्लोर

UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान, 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद

UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान झाले आहे. 11 जिल्ह्यातील 58 मतदार संघामधील 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.

Uttar Pradesh election 2022 : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामातील मतदानाचा पहिला टप्पा आज पार पडला आहे. उत्तर प्रदेशमधील 58 विधानसभेच्या जागांसाठी 58 टक्के मतदान झाले आहे. 11 जिलह्यातील 58 मतदार संघामधील  623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती, सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. मतदानावेळी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

पहिल्या टप्प्यात शामली, हापुड, गौतमबुद्ध नगर, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा या जिल्ह्यामध्ये मतदान झाले. येथील 58 विधानसभा मतदार संघात 623 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. यामध्ये 73 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. दहा मार्च 2022 रोजी कोण जिंकले, कुणाचा पराभव झाला, याचा निकाल लागणार आहे.  

58 टक्के मतदान –
सायंकाळी सहा वाजेपर्यंत 58 विधानसभा मतदार संघामद्ये 58.25 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कैराना विधानसभामध्ये झाले आहे. कैरानामध्ये 65.3 टक्के मतदान झाले. सर्वाधिक कमी साहिबाबाद या मतदार संघात मतदान झाले आहे.  साहिबाबादमध्ये 38 टक्के मतदान झालेय.

कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? 

आग्रा - 58.02 टक्के

अलीगढ -57.25 टक्के

बागपत-61.25 टक्के

बुलंदशहर-60.57 टक्के

गौतमबुद्धनगर-53.48 टक्के

गाजियाबाद-52.43 टक्के

हापुड-60.53 टक्के

मथुरा-59.34 टक्के

मेरठ-58.97 टक्के

मुजफ्फरनगर-62.09 टक्के

शामली-66.14 टक्के

105 वर्षाच्या आजीने केलं मतदान - 
मतदानासाठी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत उत्साह दिसत होता. मुजफ्फरनगरमध्ये एका मतदान केंद्रावर 105 वर्षाच्या आजींनी मतदान केलं. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘सुरक्षा आणि विकासासाठी मी मतदान केलं आहे.’

2017 मध्ये भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती - 
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडला आहे. आज 58 जागांसाठी मतदान झाले. आज मतदान झालेल्या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget