एक्स्प्लोर

नियम आणि अटींसह तिरुपती बालाजी मंदिर 80 दिवसांनी खुलं!

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराचे दार 80 दिवसांनी उघडले आहेत. तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद होतं.

हैदराबाद : जवळपास 80 दिवसांनंतर आज (8 जून) देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेलं तिरुपती बालाजी मंदिर उघडलं आहे. 8 आणि 9 जून या दोन दिवसात मंदिराचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच दर्शन घेता येणार आहे. यासाठी त्यांनाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुक करावा लागणार आहे. 10 जून रोजी मंदिर कर्मचाऱ्यांसह स्थानिक भाविक दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतात. तर 11 जून रोजी सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसातपर्यंत देशाच्या इतर भागातून येणाऱ्या भाविकांना बालाजीचं दर्शन घेता येणार आहे.

तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद होतं. इथे याआधी दरदिवशी 80 हजार ते एक लाख भाविक दर्शनासाठी येत होते. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मंदिराच्या दान-देणगीत जवळपास 500 कोटी रुपयांची घट झाली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दहा वर्षांखालील मुलांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना दर्शनाची परवानगी नाही, असं तिरुमाला तिरुपती देवस्थानम् ट्रस्टने स्पष्ट केलं. मंदिर खुलं झालं असलं तरी सध्या फक्त भगवान तिरुपतीचंच दर्शन होणार आहे. परिसरातील इतर मंदिरं आणि स्वामी पुष्करिणीमध्ये लोकांना प्रवेश करता येणार नाही.

मंदिरात कोविड-19 च्या चाचणीसाठी एक कॅम्प असेल, ज्यात दररोज 200 कर्मचारी आणि भाविकांची रॅण्डम चाचणी होईल.

दरम्यान एका दिवशी केवळ 6000 भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. एका तासात 500 लोकांना दर्शनाची परवानगी आहे. एकूण 6000 भाविकांपैकी 3000 लोकांना व्हीआयपी तिकीटावर (300 रुपये प्रती व्यक्ती) दर्शन घेता येणार आहे. यासाठीही ऑनलाईन स्लॉट बुकिंग 8 जून रोजी सकाळीच सुरु झाली आहे.

लॉकडाऊनचा फटका, देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराने 1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं! 

मंदिराने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना

  • - मंदिराचे कर्मचाऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करुन 6 आणि 7 जून रोजी दर्शन घेता येणार आहे. सुरुवातीचे तीन दिवस म्हणजेच 8, 9 आणि 10 जून रोजी मंदिराचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्शनाची परवानगी असेल. मंदिरात सुमारे 21 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
  • 10 जूनपासून लोकल भाविकांसाठी टोकन काऊंटर सुरु होतील. प्रत्येक तासाला केवळ 500 जणांनाच दर्शनाची परवानगी असेल.
  • 11 जूनपासून 3000 लोकांसाठी 300 रुपयांचे व्हीआयपी दर्शन तिकीट उपलब्ध होतील. याची बुकिंग ऑनलाईनच होईल. यासाठी ऑनलाईन कोटा 8 जूनपासूनच सुरु होणार आहे. लोकांना आपल्या सोयीनुसार तारीख निवडता येणार आहे.
  • व्हीआयपी दर्शन सकाळी 6.30 पासून 7.30 वाजपेर्यंत असेल. यासाठीही व्हीआयपी भाविकाला सेल्फ प्रोटोकॉलमध्येच जावं लागणार. कोणतंही शिफारस पत्र मिळणार नाही.
  • मंदिरातील श्रीवारी हुंडीजवळ (दानपेटी) भाविकांना हॅण्ड सॅनिटायजर दिलं जाईल.
  • मंदिरात मास्क लावणं, हात सॅनिटाईज करणं, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल टेम्परेचर इत्यादी गोष्टी अनिवार्य आहेत.
  • मंदिरात भाविकांना ज्या खोल्या धर्मशाळेत दिल्या जातील त्या रिकाम्या झाल्यानंतर 12 तासांनीच दुसऱ्यांना दिल्या जातील. खोली दर दोन तासांनी सॅनिटाईज केली जाईल.
  • धर्मशाळेच्या खोल्याही ऑड-इव्हन फॉर्म्युल्याच्या आधारावर आरक्षित केल्या जातील. एक खोलीत जास्तीत जास्त दोन जणांनाच राहता येणार आहे. 24 तासांपेक्षा जास्त वेळ खोली दिली जाणार नाही.
  • मंदिर दर दोन तासांनी सॅनिटाईज केलं जाईल.
  • मंदिरात लग्नासाठीही 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.
गुजरातमधील सोमनाथ मंदिरही खुलं नियम आणि अटींसह तिरुपती बालाजी मंदिर 80 दिवसांनी खुलं! याशिवाय गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरही भाविकांसाठी खुलं झालं आहे. गिर सोमनाथ जिल्ह्यात असलेलं सोमनाथ मंदिर आज 80 दिवसांनी उघडण्यात आलं. भगवान शंकराच्या 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेलं सोमनाथ मंदिर सध्या फक्त स्थानिक भाविकांसाठीच खुलं केलं आहे. भाविकांसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. रांगेत उभं राहण्यासाठी मंदिराच्या आत ठिकठिकाणी पायांचे स्टिकर लावले आहेत, जेणेकरुन लोक तिथेच उभे राहून सोशल डिस्टन्सिंग पाळतील.

महत्त्वाच्या बातम्या

Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
Embed widget