(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unemployment Rate: एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर 7.83 टक्क्यांवर: सीएमआयई
Unemployment Rate In India: देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता.
Unemployment Rate In India: देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून, शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.22 टक्के होता, तर मार्चमध्ये तो 8.28 टक्के होता.
एप्रिल महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे
देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.18 टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये हा दर 7.29 टक्के होता. CMIE च्या मते, हरियाणामध्ये सर्वाधिक 34.5 टक्के बेरोजगारी दर नोंदवला गेला आहे. त्यानंतर राजस्थान 28.8 टक्के बेरोजगारी दरासह दुसऱ्या स्थानावर आहे. बिहार 21.1 टक्क्यांसह तिसर्या आणि जम्मू-काश्मीर 15.6 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रमबल भागीदारी आणि रोजगार दरात झाली वाढ
सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, एप्रिलमध्ये कामगार श्रमबल भागीदारी दर आणि रोजगार दरातही वाढ झाली आहे. त्यांनी ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली प्रगती असल्याचे म्हटले आहे. व्यास म्हणाले की, एप्रिल 2022 मध्ये रोजगाराचा दर 37.05 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो महिन्यापूर्वी 36.46 टक्के होता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : सेन्सेक्स, निफ्टीत किंचित घसरण; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर
- Fuel Price Hike : महागाईचा तडाखा; LPG च्या मागणीत घट, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल किती झाली विक्री
- खुशखबर! कार खरेदीदारांना मिळणार स्वस्त कर्ज, 'या' बँकेने केले आपले व्याजदर कमी
- Tata Coffee : शॉर्ट टर्मसाठी शेअर घ्यायचे असतील, तर टाटा कॉफीच्या शेअर्सची बातमी फायदेशीर ठरेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha