Share Market : सेन्सेक्स, निफ्टीत किंचित घसरण; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर
Share Market Closing Bell: आज शेअर बाजारात नफा वसुली दिसून आली. विक्रीचा जोर असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात घसरण झाली.
Share Market Closing Bell: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद झाला. आज शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स 84.88 अंकानी आणि निफ्टी 33.45 अंकांच्या घसरणीसह बंद झाले. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 500 अंकानी घसरला होता.
अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. त्यामुळे आज विक्रीचा सपाटा दिसून येत होता. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 56,975.99 अंकावर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 33.45 अंकाची घसरण झाली आणि 17,069.10 अंकावर बंद झाला.
आज निफ्टी ऑटो, निफ्टी ऑटो, पीएसयू बँक, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस या क्षेत्रातील शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय, निफ्टी रिअल्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, फार्मा, मेटल, मीडिया, FMCG,वित्तीय सेवा आणि निफ्टी बँक आदी क्षेत्रात तेजी दिसून आली.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 11 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर 19 कंपन्यांचे शेअर घसरले. टायटनमध्ये आज मोठी घसरण झाली. टायटनच्या शेअरमध्ये 2.88 टक्क्यांची घसरण होत 2388 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
आज विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, मारुती, एशियन पेंट्स, एसबीआय, कोटक बँक, एचसीएल टेक, एलटी, बजाज फायनान्स, सन फार्मा, रिलायन्स, एचयूएल, टीसीएस, आदी स्टॉकच्या शेअरची जोरदार विक्री झाली.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर 600 अंकानी सेन्सेक्स घसरला. अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. त्याशिवाय, जगभरात पु्न्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: