एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उमा भारतींसह चार मंत्र्यांचा राजीनामा सादर
केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या राजीनाम्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती, संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनीही आपला राजीनामा सादर केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी चार मंत्र्यांनी राजीनामा सादर केल्याची माहिती समजते आहे.
2 किंवा 3 सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात ही मोठी उलथापालथ दिसून येत आहे.
केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर. उमा भारती यांनी देखील आरोग्याचं कारण पुढे करत आपला राजीनामा सादर केला आहे. मात्र, असं असलं तरी बाबरी मशीद प्रकरणात नाव आल्यानं उमा भारती यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे.
उमा भारती यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे महेंद्रनाथ पांडेय यांची उत्तरप्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आज (गुरुवार) भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली यावेळी अरुण जेटलींसह आठ मंत्री हजर होते. याच बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement