एक्स्प्लोर

आधार हॅक करणं अशक्य, शर्मा यांचा डेटा सुरक्षित, UIDAI चं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा चुकीचा आहे. आधार नंबरने कोणतीही माहिती चोरण्यात आलेली नाही आणि चोरण्यात येऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी आपला आधार नंबर जाहीरपणे शेअर करत याबाबतची कोणतीही माहिती हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं. फ्रान्सच्या एका हॅकरने ते आव्हान स्वीकारत आधारशी लिंक असलेला त्यांचा मोबाईल नंबरच ट्विटरवर शेअर केला. आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा चुकीचा आहे. आधार नंबरने कोणतीही माहिती चोरण्यात आलेली नाही आणि चोरण्यात येऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे. आर. एस. शर्मा हे सिविल सर्वंट असून त्यांचा फोन नंबर अनेक वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय त्यांची जन्मतारीखही आयएएस अधिकाऱ्यांच्या सिविल लिस्टमध्ये आहे. तर ट्रायचे चेअरमन म्हणून त्यांचा पत्ताही वेबसाईटवर आहे. त्याचपद्धतीने ई-मेल आयडीही ट्रायच्या वेबसाईटवर आहे. शर्मा यांची सार्वजनिक माहिती काढूनच ती हॅक केल्याचा दावा केला जात असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे. आधार हॅक करणं अशक्य, शर्मा यांचा डेटा सुरक्षित, UIDAI चं स्पष्टीकरण सध्याच्या डिजिटल युगात गुगलसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकते आणि ती सार्वजनिक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांनी यावर विश्वास ठेवू नये. कारण, आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं आवाहन यूआयडीएआयने केलं. आपण पॅन किंवा मोबाईल नंबर सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी वापरतो. त्यामुळे हे दोन्ही नंबर माहिती असले तरी विविध वेबसाईटच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकते, असं सांगत यूआयडीएआयने नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे सध्या गोपनीय माहितीबद्दल सुप्रीम कोर्टापासून ते सर्वसामान्यांपर्यंत चर्चा आहे. यातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं. फ्रान्सच्या एका हॅकरने शर्मा यांचं हे आव्हान स्वीकारलं आणि थेट त्यांच्या आधार क्रमांकाशी लीक असलेला मोबाईल नंबरच ट्विटरवर जाहीर केला. ''तुमचा पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर आधार क्रमांकाद्वारे मिळवला जाऊ शकतो. तूर्तास इथेच थांबतो. आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक आहे ते तुम्हाला आता तरी कळलं असेल,'' असं ट्वीट एलियट एल्डर्सन याने केलं. आधार हॅक करणं अशक्य, शर्मा यांचा डेटा सुरक्षित, UIDAI चं स्पष्टीकरण आधारचा डेटाबेस भक्कम असून कुणीही तो हॅक करु शकत नाही. आधारची माहिती गोपनीयच आहे, असा दावा नेहमीच केला जातो. आर. एस. शर्मा यांनीही असाच दावा केला आणि स्वतःचा आधार क्रमांक शेअर केला. एल्डर्सन याने काही तासातच आधार नंबरशी लिंक असलेला फोन नंबरच ट्विटरवर शेअर करत हे आव्हान स्वीकारलं. विशेष म्हणजे एल्डर्सन या हॅकरने जो नंबर शेअर केला, तो शर्मा यांचा नाही, असंही त्याने सांगितलं. कारण, तो फोन नंबर शर्मा यांच्या सचिवांचा असल्याचाही पुरावा त्याने शेअर केला. दरम्यान, हा हॅकर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने जो मोबाईल नंबर शोधला, त्या नंबरने सुरु असलेल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा डीपीही काढून दिला. शिवाय शर्मा आणि हॅकर यांच्यात यावरुन दावे-प्रतिदाव्याचा खेळही रंगला. शिवाय शर्मा यांना ट्वीटर युझर्सनेही अनेक प्रश्न विचारले. यानंतर शर्मांनी पुन्हा ट्वीट केलं. ''तू सांगतोयस तेवढा चांगला हॅकर नाहीस. या माझ्या आधारशी सर्व बँक अकाऊंट लिंक आहेत. ते तू काढू शकलेला नाहीस.. आणि काढले तरी काय?'' असा टोला शर्मा यांनी लगावला. या सगळ्या प्रकरणानंतर आता यूआयडीएयआयने आपली बाजू मांडली आहे. हॅकरचा दावा, यूआयडीएआयचं उत्तर आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबर काढला - शर्मा यांचा मोबाईल नंबर अगोदरच पब्लिक डोमेन असून तो विविध वेबसाईटवर उपलब्ध आहे. या आधार क्रमांकाने शर्मा यांची जन्मतारीख, पत्ता आणि वैयक्तिक माहिती काढली जाऊ शकते - शर्मा यांची जन्मतारखी आयएएस अधिकाऱ्यांच्या सिविल यादीत अगोदरच उपलब्ध आहे. शिवाय ट्रायच्या वेबसाईटवर त्यांचा पत्ताही मिळेल. शर्मा यांचा मेल आयडी हॅक केला - शर्मा यांचा मेल आयडी ट्रायच्या वेबसाईटवर पब्लिक डोमेन आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget