एक्स्प्लोर
Advertisement
25 नोव्हेंबरला महिला आघाडी, युवासेनेने अयोध्येत येऊ नये, उद्धव ठाकरेंचे आदेश
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी 25 नोव्हेंबरला महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी 25 नोव्हेंबरला महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान अयोद्धा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
अयोध्येत राम मंदिर बांधा, नाही तर हा एक चुनावी जुमला होता, असं जाहीर करा म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असं ते म्हणाले होते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला होता.
शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेनं सेनाभवनासमोर पोस्टरबाजी केली. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असं पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आलं होतं. शिवसेनेच्या दसरा मेळावा कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असंही ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? थेट प्रश्न केला होता.
वडिलांचं स्मारक बांधता नाही आलं ते राम मंदिर काय बांधणार? : अजित पवार
उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ज्यांना आपल्या वडिलांचं स्मारक पाच वर्षात बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार? अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
अजित पवार जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. "मुंबई महानगर पालिका ताब्यात असताना, सरकारमध्ये असताना पाच वर्षात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक ज्यांना बांधता येत नाही ते आम्हाला शिकवतात", अशी टीका अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement