एक्स्प्लोर
काश्मीरमध्ये पर्यटकांच्या गाड्यांवर दगडफेक, नाशिकचे 35 पर्यटक सुखरुप

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : नाशिकमधील पर्यटकांच्या गाडीवर काश्मीर खोऱ्यात दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे. दंगलखोरांनी काही काळ नाशिकच्या 35 पर्यटकांना अडवूनही धरलं होतं. काल संध्याकाळच्या दरम्यान अवंतीपुरा संगम इथं हा संपूर्ण प्रकार घडला. स्थानिकांनीच हस्तक्षेप करत दंगलखोरांपासून पर्यटकांची सुखरुप सुटका केली. नाशिकमधून एकूण 140 लोक काश्मीरमध्ये गेले आहेत. सध्या तिन्ही वाहनं आणि लोक अनंतनाग इथं पोहोचले असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात काल हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा बुरहान वानीला ठार केलं गेलं. तेव्हापासून काश्मीर खोरं अशांत बनलं आहे. मुजाहिद्दीनचा काश्मीर खोऱ्यातला पोस्टर बॉय, अशी बुरहानची ओळख होती. बुरहान वानीचा खात्मा हे भारतीय जवानांच्या दृष्टीनं मोठं यश आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























