एक्स्प्लोर

Todays Headline 15th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Todays Headline 15th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू

युवासेनेचे राज्यभरात आंदोलन- 
वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. 'शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.' 

लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा लिलाव -
गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या (Lalbaug News) राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणी माथा टेकवता आला. दर्शनासाठी दहा दिवस भक्तांनी गर्दी केली होती.  मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे. 
 
मुंबईत यलो अलर्ट -
पुढील दोन दिवस मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आला आहे. मुंबईसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केलाय. त्याशिवाय पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम सुरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

सुप्रीम कोर्टात सुनावणी -
युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या मेडिकल विद्यार्थांना भारतातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा, या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  मागील सुनावणीवेळी विदेश मंत्रालयात हा विषय हाताळत असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिली होती. केंद्र सरकार या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. 

विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समरकंद दौऱ्याबाबत विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबात सविस्तर माहिती देण्यासाठी सकाळी 11 वाजता विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबात माहिती देणार आहेत.  

पीएम नरेंद्र मोदी समरकंद दौऱ्यावर जाणार - 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एससीओ शिखर सम्मेलन 2022 साठी समरकंदला जाणार आहेत. आज सायंकाळी पंतप्रधान रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि उजबेकिस्तान के राष्ट्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी समरकंदसाठी रवाणा होणार आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांना मोदी भेटण्याची शक्यता आहे. 

गोवा काँग्रेसची महत्वाची बैठक - 
गोव्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.  काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे आज गोवा काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेसचे प्रभावी प्रमोद गुंडराव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता आहे.  

केजरीवाल यांची पत्रकार परिषद - 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.  

कॅथरीन कोलोना यांच्या दौऱ्याचा अखेरचा दिवस -
फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.  कोलोना यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

नोरा फतेहीला ईडीची नोटीस, आज होणार चौकशी -
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. ईडी नोरा फतेहीची उद्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही आज सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहे.  याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला जाणार -
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)  देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
Embed widget