एक्स्प्लोर

EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार

Pension Scheme : केंद्र सरकार सर्वांसाठी पेन्शन योजना आणण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे अधिक लोकांना पेन्शन देण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार सर्व नागरिकांसाठी 'यूनिवर्सल पेन्शन योजना' आणणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं  यावर काम सुरु केलं आहे. ही  योजना ऐच्छिक असेल, अशी माहिती आहेत. या योजनेत सदस्यांना स्वत: देखील आर्थिक योगदान द्यावं लागेल, त्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल. सरकार या योजनेची अंमलबजावणी ईपीएफओ तर्फे लाँच करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पायाभूत सुविधांसंदर्भात काम सुरु असल्याची माहिती आहे. या संदर्भातील काम पूर्ण झाल्यास श्रम आणि रोजगार मंत्रालय इतर मंत्रालयांसोबत चर्चा करेल. यासंदर्भातील वृत्त 'नवभारत टाइम्स' या हिंदी दैनिकानं दिलं आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या योजनेत जुन्या योजनांचा देखील समावेश केला जाईल. या योजनेत अधिक लोकांना सदस्य करुन घेतलं जाऊ शकतं. असंघटित क्षेत्रातील मजूर, व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळेल.18 वर्ष पूर्ण  झालेला किंवा त्यापेक्षा अधिक वअसणारा व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या योजनेत घेतलं जाईल. या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत. दोन्ही योजनांमध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मिळतात. यामध्ये दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. अटल पेन्शन योजनेला देखील यामध्ये घेतलं जाऊ शकतं. केंद्र सरकारकडून  राज्य सरकारांना देखील त्यांच्या पेन्शन योजनांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी सांगू शकते. यामुळं सरकारी योगदान सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात वाटलं जाईल. पेन्शन रक्कम वाढण्यात याचा फायदा होईल. 

अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळते?

अटल पेन्शन योजनेचं खातं बँक किंवा पोस्टामध्ये उघडता येतं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 40 वयाच्या दरम्यान असावं लागतं. जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळी  तुम्हाला नॉमिनीची माहिती द्यावी लागते.  समजा एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेचा सदस्य होत असेल तर त्याला 1456 रुपये दरमहा भरावे लागतील. तर, याशिवाय एका व्यक्तीचं वय  18 वर्ष असेल तर त्याला दरमहा  210 रुपये भरावे लागतील. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 5000 रुपयांपर्यंत  रक्कम पेन्शन मिळते. 

दरम्यान, जे लोक आयकर भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. 

इतर बातम्या :

Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget