Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
कोल्हापुरातून काही भागातील शेतकरी आणि जमीन मालकांचा या महामार्गाला प्रचंड विरोध आहे. हा महामार्ग रद्द करण्याचा मागणीसाठी तिथे आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर MSRDC ने यावर महत्वाची भूमिका घेतलीय

Nagpur Goa Shaktipeeth Highway: राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा मोठा विरोध होतोय. या महामार्गासाठी राज्यातील 27 हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे. मात्र या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आता कोल्हापुरातील प्रस्तावित संरेखन वळवून शक्तिपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी मोठा निर्णय घेतलाय. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन अखेर पर्यायी संरेखन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध मावळला नाही तरच पर्यायी महामार्ग MSRDC वापरणार असल्याचे सांगण्यात येतय. (Shaktipeeth Highway)
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 805 किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाचे संरेखन अंतिम झाले असून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. विशेषतः कोल्हापुरातून काही भागातील शेतकरी आणि जमीन मालकांचा या महामार्गाला प्रचंड विरोध आहे. हा महामार्ग रद्द करण्याचा मागणीसाठी तिथे आंदोलनही करण्यात आले. विरोध मावळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणार असून राज्य सरकार आणि एमएसआरडीसी शक्तिपीठ महामार्ग मार्गी लावण्यावर ठाम आहेत.
शेतकरी आणि जमीन मालकांचा का होतोय विरोध?
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक प्राचीन शक्तीपीठांना जोडणारा 805 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ मार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. या शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. मात्र या जमिनी पिकाहू असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसह जमीन मालकांचा या महामार्गाला कडाडून विरोध आहे. सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
कोल्हापूर ऐवजी पर्यायी मार्गाची संरेखना?
नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आता अखेर कोल्हापुरातील प्रस्तावित संरेखन वगळून शक्तिपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यावर पर्यायी विचार करण्यास सुरुवात केली आहे .यासाठी पर्यायी संरेखन करण्यात येणार आहे . मात्र महामार्गासाठी होणारा विरोध मावळला नाहीच तर पर्यायी संरेखनानुसार शक्तिपीठ महामार्ग कोकणात नेण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची भूमिका एमएसआरडीसीने घेतली आहे . कोल्हापूरकरांचा ह शेतकरी व जमीन मालकांचा विरोध मावळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात आलंय .
हेही वाचा:
























