एक्स्प्लोर

Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर

Gaja Marne: संबधित प्रकरणातील भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती आहे.

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातील भेलकेनगर या ठिकाणी 19 फेब्रुवारीला शिवजंयतीच्या दिवशी मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेला तरूण हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक  (Gaja Marne Arrested) करण्यात आली आहे. तर रूपेश मारणे आणि बाब्या पवार अद्याप फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गजा मारणेला काल (25 तारखेला) कोर्टात हजर करण्यात आले. युक्तिवाद करताना गजा मारणेवर तपास अधिकाऱ्यांकडून बरेच आरोप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे गजा मारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आरोपीला शुगर आणि हार्टचा त्रास असल्याची माहिती देताच कोर्टाने गजाला मेडिकल हेल्प सगळी द्या असे आदेश दिले आहेत. संबधित प्रकरणातील भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचे सीसीटीव्ही पोलिसांकडे आले असून मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावर उभा होता आणि तो त्याच्या सहकाऱ्यांना तो याला मार माज आलाय अशा सूचना देखील देत होता, अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

याला माज आलाय याला मारा, गजाच्या मारहाण करणाऱ्यांना सूचना?

या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र जोगला ज्यावेळी मारहाण झाली, त्यावेळी या फुटेजमध्ये मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावरच उभा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. त्याचबरोबर याला माज आलाय, याला मारा अशा सूचना देखील गजा मारणे देत होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यासंदर्भात पुरावे देण्यात आले आहे. अशी माहिती आहे. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर 3 मार्चपर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे.

गजा मारणेच्या वकीलांनी कोर्टात केली पोलिसांची तक्रार 

गजा मारणेचे वकील म्हणाले, ज्यावेळी जोगला मारहाण झाली त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.सिनेमा बघितल्यानंतर जी काही भांडण झाली आहेत. त्यामध्ये दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. हा कट नसून निव्वळ एक अपघात आहे. 

माझ्या क्लाइंटला खाली मांडी घालून बसवलं आणि फोटो व्हायरल केला. हा अत्यंत बालिशपणा आहे. फरार आरोपी हजर होतं नाही म्हणून यांना पकडण्यात आलं आहे.  पोलिसांनी प्रेशरमध्ये येऊन काम केलं आहे. या प्रकरणात 307 कलम कसं काय लागू होऊ शकतं? काल पर्यंतच्या रिमांड कॉपीमध्ये असा उल्लेख केला आहे की, ए त्या माणसाला मारा असं कुठेही नाहीये. नाकावर फ्रॅक्चर असल्यावर 307 कलम कसं लागू होऊ शकतं. या वातावरणात माझ्या क्लाइंटला कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे, गजा मारणेचा भाचा आला नाही म्हणून गजा मारणेला यामध्ये गुंतवण्यात आले आहे. दबावाखाली काम सुरू आहे. सध्या जे पेपर बनवले जात आहेत, ते पूर्णपणे बनावट आहेत. गजा मारणेला पोलीस स्टेशनला नेऊन खाली फरशीवर नेऊन बसवलं आणि फोटो व्हायरल केला हे मानवाधिकाराच हनन आहे,असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला आहे.  

मी रिट पेटिशन देखील दाखल करणार आहे. तोंडावर काळा कपडा बांधून नेण्यात येतं, खाली बसवून फोटो व्हायरल करण्यात येतो. पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही. गजा मारणे हा शुगर पेशंट आहे. पोलिसांनी फोटो व्हायरल केला, चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला आहे, अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलाची कोर्टाकडे केली आहे. 

मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावं नाहीतर...

तर सहाय्यक पोलीस आयुक्तत गुन्हे शाखा (investigation officer) गणेश इंगळे यांनी माहिती देताना सांगितलं आरोपी विरोधात 28 गुन्हे दाखल आहे. त्याची पुणे शहरात दहशत आहे. सखोल तपास करण्यासाठी कस्टडी असणं अत्यंत महत्वाची आहे. सीसीटीव्ही CCTV फुटेज आहे, त्याचाही सखोल तपास करायचा आहे, त्यावरती मजा मारणेच्या वकीलांनी युक्तिवाद करताना मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, असं म्हटलं आहे, तर सीसीटीव्ही नसेल तर ऑडियो क्लिप ऐकवावी ज्यात म्हणलं आहे, त्याला मारा असा जोरदार युक्तीवाद गजा मारणेच्या वकीलांनी केला आहे. न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर गजानन मारणे याला पुणे न्यायालयाने 3 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget