Tirupati Temple Fine: तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड, भक्ताला सेवा देण्याचा विलंब भोवला, वाचा सविस्तर प्रकरण
Tirupati Temple Fine : भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Tirupati Temple Fine : तिरुपती मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतं. आता मात्र तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
'...अन्यथा 50 लाख रुपये भरपाई द्या'
ग्राहक न्यायालयाने तामिळनाडू येथील तिरुमला तिरुपती देवस्थानाला (TTD - Tirumala Tirupati Devasthanams) भक्ताला 14 वर्षे वाट पाहण्यासाठी 50 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. एका भक्ताने तिरुपती देवस्थानाविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता. असा खटला दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
भक्त के.आर.हरी भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी 14 वर्षांआधी म्हणजे 2006 साली बुकींग केली होती. कोरोनाकाळात तिरुपती मंदिर 80 दिवसांसाठी बंद होतं. त्यामुळे मंदिरातील वस्त्रालंकारासह सर्व सेवा बंद होत्या. त्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानानं (TTD) भक्त हरी भास्कर यांना अधिकृत निवेदन पाठवत विचारणा केली होती की त्यांना VIP ब्रेक दर्शनासाठी नवीन स्लॉट हवा आहे की परतावा. यावर भास्कर यांनी देवस्थानाला वस्त्रलंकार सेवेसाठी कोणत्याही तारखेची बुक देण्यास सांगितलं होतं.
पाहा व्हिडीओ : तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड
हरी भास्कर यांची ग्राहक न्यायालयात धाव
मात्र त्यानंतर देवस्थानानं वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देता येणार नसल्याचं सांगत त्यांना परतावा घेण्यास सांगितला. यानंतर भक्त के.आर.हरी भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायलयाने भक्ताच्या बाजूनं निकाल देत तिरुपती देवस्थानाला भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.
तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड
न्यायालयाने तिरुपती देवस्थानाला 2006 भास्कर यांनी भरलेल्या बुकींग रकम वार्षिक 24 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर यांनी 12,250 रुपये बुकिंग रक्कम भरली होती. नवीन तारीख द्या अन्यथा बुकींग रकमेच्या व्याजासह 50 लाख नुकसानभरपाई द्या, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. तिरुपती देवस्थानाच्या सेवेतील कमतरतेच्या विरोधात एखाद्या भाविकाने ग्राहक न्यायालयात खटला दाखल केल्याची ही पहिलीच घटना आहे.