(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parliament Special Session 3rd Day: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; लोकसभा अन् राज्यसभेत कोणती विधेयकं मांडली जाणार?
आज विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. तर, हे विधेयक राज्यसभेत आधीच मंजूर करण्यात आलं आहे.
Parliament Special Session 3rd Day: संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या (Parliament Special Session) तिसऱ्या दिवसाचं कामकाज बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. आज केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) विविध विधेयकं मांडणार आहेत. काही विधेयकांवर संसदेत चर्चा होणार असून सरकार या विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे आज बुधवारी संसदेचं कामकाज गोंधळात पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोदी सरकरानं 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच विरोधकांनी विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. काल (मंगळवारी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनातून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आज विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women's Reservation Bill) चर्चा होणार आहे. हे संविधानाचं 128 वं दुरूस्ती विधेयक आहे. तसेच, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल (दुरुस्ती) विधेयक, 2023 सभागृहात मांडतील. मेघवाल हे प्रस्तावित करतील की, कायदा, 1961 मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या विधेयकाचा विचार करण्यात यावा. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. दरम्यान, महिला आरक्षण विधेयक 3 ऑगस्ट 2023 रोजीच राज्यसभेत मंजूर झालं आहे.
विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत काय घडणार?
- कामकाजातील मुद्दे पटलावर मांडले जातील. सभागृहाच्या पटलावर मुद्दे मांडण्यासाठी मंत्र्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. यामध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयासाठी अर्जुन राम मेघवाल, रेल्वे मंत्रालयासाठी दानवे रावसाहेब दादाराव, ग्राहक व्यवहा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयासाठी साध्वी निरंजन ज्योती, सांस्कृतिक मंत्रालयासाठी मीनाक्षी लेखी, शिक्षण मंत्रालय डॉ. सुभाष सरकार यांचा समावेश करण्यात आला आहे.
- लोकलेखा समितीचा अहवाल संसदेत मांडला जाईल. अधीर रंजन चौधरी आणि डॉ. सत्यपाल सिंह हा अहवाल सादर करणार आहेत.
- सभागृहाच्या बैठकीत सदस्यांच्या अनुपस्थितीवर समितीची 2 मिनिटांची बैठक होईल. तसेच, रवनीत सिंह, रामशिरोमणी वर्मा 9 ऑगस्ट 2023 रोजी सभागृहाच्या बैठकींना सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल समितीच्या अकराव्या बैठकीचं इतिवृत्त मांडतील.
- याशिवाय कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल विकास स्थायी समितीचा अहवाल लोकसभेत मांडला जाणार आहे. भर्त्रीहरी महताब, नायब सिंह 51 वा अहवाल सादर करतील. हा अहवाल लोकसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार, 11 सप्टेंबर रोजी सादर करण्यात आला होता. त्यावेळी सभागृहाचे अधिवेशन सुरू नव्हतं आणि सभापतींनी छपाई आणि प्रकाशनाचे आदेश दिले होते.
विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यसभेत काय घडणार?
चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगवर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पोस्ट ऑफिस विधेयक मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत.
- चर्चेसाठी मुद्दे सभागृहाच्या पटलावर मांडले जातील. त्यासाठी मंत्र्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. यामध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी किरेन रिजिजू, अर्थ मंत्रालयासाठी पंकज चौधरी, अन्नपूर्णा देवी आणि डॉ. सुभाष सरकार शिक्षण मंत्रालयासाठी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर केला जाईल. सार्वजनिक खात्यांवरील समितीचा अहवाल सादर केला जाईल.
- त्याचवेळी कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल रिपीलिंग अँड अॅमेंडिंग बिल, 2023 (Repealing and Amending Bill, 2023) सादर करतील. ते कायदे रद्द करण्याचा आणि एका कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव देतील. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाईल. हे विधेयक मंजूर करण्याचाही प्रस्ताव आहे.
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पोस्ट ऑफिस विधेयक, 2023 (Post Office Bill, 2023) सादर करतील आणि भारतातील पोस्ट ऑफिसशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या विचारावर चर्चा करतील. हा प्रस्ताव राज्यसभेतही मंजूर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.