एक्स्प्लोर
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल तेलगीची प्रकृती खालावली
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल तेलगीवर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
बंगळुरु : स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची तब्येत खालावली असून सध्या त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं असल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे.
सध्या त्याच्यावर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवाशी असलेला अब्दुल करीमने केलेल्या कोट्यवधी रुपयांचा बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्याचा भाऊ अजिम तेलगी हा खानापूर नगरपालिकेचा विद्यमान उपनगराध्यक्ष असून, या घोटाळ्याप्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली होती.
अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून हा बनावट मुद्रांक व्यवसाय थाटला होता. या व्यवसायाला शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश येथून छुपे पाठबळ होते.
यापूर्वी तेलगी याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याने पत्नी व मुलीची भेट व्हावी आणि विविध आजाराने त्रस्त असल्याच्या कारणाने न्यायालयाला आपल्याला बंगळुर येथील कारागृहात ठेवण्यात यावे असा विनंती अर्ज केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला बंगळुरु येथील परप्पन अग्रहार कारागृहात ठेवले होते.
तेलगीने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यासह मुंबई, पुणे आदी ठिकाणी या बनावट मुद्रांक विक्रीतून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement