एक्स्प्लोर
... तर देशातील 74 टक्के जनतेवर NDA चं राज्य!
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा परिवार दिवसेंदिवस वाढतच आहे. बिहारमधील जेडीयूनंतर आता तामिळनाडूमधील एआयएडीएमकेही एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा परिवार दिवसेंदिवस वाढत आहे. बिहारमधील जेडीयूनंतर आता तामिळनाडूमधील एआयएडीएमकेही एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिली आहे. असं झाल्यास देशातील 74 टक्के जनतेवर एनडीएचं राज्य असेल.
सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या मोठ्या 13 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, नागालँड आणि बिहार या पाच राज्यांमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. या राज्यातील एकूण लोकसंख्या 53.26 टक्के एवढी आहे. यामध्ये तामिळनाडूचा समावेश झाल्यास आणखी 20.52 टक्क्यांनी हा आकडा वाढेल. त्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांचं मिळून देशातील 74 टक्के जनतेवर राज्य असेल.
एआयएडीएमके लोकसभेतील सर्वात मोठा तिसरा पक्ष
लोकसभेत भाजप आणि काँग्रेसनंतर सर्वात जास्त खासदार असणारा एआयएडीएमके हा तिसरा पक्ष आहे. एआयएडीएमकेचे लोकसभेत 37, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. एआयएडीएमकेने तामिळनाडूमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी 130 जागा एआयएडीएमकेने जिंकल्या आहेत.
एनडीएला राज्यसभेत फायदा
बिहारमधील जेडीयूनंतर एआयएडीएमके एनडीएमध्ये सहभागी झाल्यास सरकारला सर्वात मोठा फायदा राज्यसभेत होईल. कारण राज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि गोव्यात भाजपची सत्ता आहे. तर आंध्र प्रदेश, जम्मू-कश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि आता बिहारमध्येही भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे.
संबंधित बातम्या :
जयललितांचा AIADMK एनडीएमध्ये सहभागी होण्याची चिन्हं
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी चेहरे
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement