एक्स्प्लोर
जीन्स पँटच्या कमरेला बांधून सोने तस्करी, गोव्यात दुबईच्या प्रवाशाला पकडले
झडती घेतली असता त्याने आपल्या जीन्स पँटवर कमरेच्या भागात पाकीटात काहीतरी चिकटवून आणल्याचे अधिकाऱ्यांच्या नजरेस आले. अधिकाऱ्यांनी त्वरित हे पाकीट उघडले असता यात पावडर पद्धतीने तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. हे सोने अधिकाऱ्यांनी कस्टम कायद्याखाली जप्त केले.
पणजी : दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाने आपल्या जीन्स पँटच्या कमरेला बांधून तब्बल 590 ग्राम तस्करीचे सोने आणले होते. हे सोने त्या प्रवाशाने पावडर स्वरुपात लपवून आणल्याचे तपासणीच्या वेळी उघड झाले आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी हे 18 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.
दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडियाच्या एआय 994 मधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका प्रवाशावर संशय आला. त्याची झडती घेतली असता त्याने आपल्या जीन्स पँटवर कमरेच्या भागात पाकीटात काहीतरी चिकटवून आणल्याचे अधिकाऱ्यांच्या नजरेस आले. अधिकाऱ्यांनी त्वरित हे पाकीट उघडले असता यात पावडर पद्धतीने तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. हे सोने अधिकाऱ्यांनी कस्टम कायद्याखाली जप्त केले.
जप्त करण्यात आलेले सोने 590 ग्राम वजनाचे असून भारतीय बाजारात त्याची किंमत 18 लाख 9 हजार 684 रुपये असल्याचे आढळून आले आहे. हे तस्करीचे सोने कुठे नेण्यासाठी आणले होते व कुठून आणले होते याबाबत अधिक तपास चालू आहे.
1 एप्रिल 2018 ते आजपर्यंत विविध तस्करीच्या प्रकरणात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी एकूण 2 कोटी 54 लाख 50 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली. याबरोबरच दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात विविध प्रकरणात कारवाई करून बेकायदेशीररित्या नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेली 75 लाख 14 हजार रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement