एक्स्प्लोर

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; 20 मे रोजी शपथविधी, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

Siddaramaiah Oath Ceremony: 20 मे रोजी कर्नाटकात शपथविधी होणार आहे. काँग्रेसचे केसी वेणुगोपाल म्हणाले की, या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेतील.

Karnataka Swearing-In-Ceremony: कर्नाटकात (Karnataka Assembly Elections 2023) अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता काँग्रेसनं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसकडून (Congress) शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

केसी वेणुगोपाल पुढे बोलताना म्हणाले की, सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. 13 मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, 14 मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षानं निरीक्षकांची नियुक्ती केली. ते म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार हे दोघंही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत विजय झाल्यानंतर 14 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) संध्याकाळी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून विधीमंडळ पक्षनेते निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. यानंतर आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी बंगळुरूला पाठवलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया हे तीन निरीक्षक सोमवारी दिल्लीत परतले. या नेत्यांनी आमदारांची मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही घेतलं.

अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा नाहीच

डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मिळतील, परंतु याला काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरील चर्चा 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, सिद्धरमय्या यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला. याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कर्नाटकात काँग्रेसची सरशी, तर भाजपचा दारुण पराभव 

कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसनं 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप 66 जागा आणि जेडीएस 19 जागांवर घसरले. 13 मे रोजी (शनिवारी) राज्यात निकाल लागला. तेव्हापासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न कायम होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget