Shravan | हिंदुंचा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून उत्तर भारतात सुरुवात
हिंदुंचा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून उत्तर भारतात सुरुवात होत आहे. आपल्यापेक्षा 15 दिवस आधी श्रावण महिना उत्तर भारतात सुरू होतो.
मुंबई : हिंदू धर्मातील पवित्र श्रावन महिना आजपासून उत्तर भारतात सुरू होत आहे. या महिन्याची सुरुवात सोमवारपासून होते. श्रावन महिना हा महादेवाला प्रिय असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे (महाराष्ट्रात) पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असा श्रावन महिना असतो तर उत्तरेकडे प्रतिपदा ते पौर्णिमा असा श्रावण महिना साजरा करतात. त्यामुळे आपल्यापेक्षा 15 दिवस आधी श्रावण महिना उत्तर भारतात सुरू होतो.
श्रावण महिना 6 जुलैला सुरू होणार असून 3 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची पूजा, प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात शिवभक्त कावड यात्रा देखील सुरू करतात. यावेळी श्रावण महिन्यात शुभ योग असल्याचे सांगितले जात आहे. कावड यात्री या महिन्यात पायी शिवमंदिरात जाऊन महादेवाला जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यात काशीमधील मंदिरांमध्ये खास तयारी केली जाते. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने यावर विरजन पडण्याची शक्यता आहे.
श्रावण महिन्याचं महत्व श्रावण हा श्रवणभक्तीचा महिना होय. श्रावणात अनेक शिवमंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलेले असते. श्रावणी सोमवारी हमखास या शिवमंदिरांमधून कीर्तने होतात. `हरी हरा भेद काही करू नका वाद` ही संतांची धारणा आहे. `शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या माथी` असे संतांनी म्हटले आहे. श्रावणात वारकरी कीर्तन आणि हरदासी कीर्तन हमखास ऐकायला मिळाले इतकेच नव्हे तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनाही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला `पोथी लावणे` `पोथी सांगणे` असे म्हणतात.
सरकारने आदेश दिल्यास साई मंदिर खुलं करण्यास साई संस्थान सज्ज
श्रावणवर कोरोनाचं सावट उत्तर भारतात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात शिवभक्त मोठ्या प्रमाणात व्रत वैकल्य करतात. कावड यात्राही या महिन्यातचं निघते. शिवमंदिरांमध्ये कार्यक्रम, पुजा, अर्चना कीर्तने असतात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचं सावट श्रावण महिन्यावर आहे. त्यामुळे शिवमंदिरे बंद असणार आहेत. शिवभक्तांनी घरी राहूनचं श्रावण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Guru Purnima 2020 | कोरोनामुळे स्वामी समर्थ मंदिरात शुकशुकाट