एक्स्प्लोर

मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड

नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात आपलं निवदेन मांडलं. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. निवेदनात रवींद्र गायकवाड यांनी सभागृहाची माफी मागितली. पण आपण एअर इंडिया किंवा त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेलं 308 कलम म्हणजेच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा रद्द करण्याची मागणीही रवींद्र गायकवाड यांनी केली. ‘तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, तुमच्याकडून मी न्यायाची अपेक्षा करतो.’ असं म्हणत गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे एअर इंडियाविरोधात गाऱ्हाणं मांडलं. ‘मी अधिकाऱ्याला मारहाण केली हा मुद्दा चुकीचा आहे. अधिकाऱ्यानं माझ्यासोबत अरेरावी केल्यानंतर मला त्यानं धक्का दिला. त्यानंतर मी देखील त्याला ढकललं. याप्रकरणी माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा माझ्यावर अन्याय आहे. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेलं 308 कलम तात्काळ रद्द करण्यात यावं.’ अशी मागणी गायकवाड यांनी केली. लोकसभेत नेमकं काय म्हणाले रवींद्र गायकवाड? ‘एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं.’ ‘मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलेलं असतानाही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवलं गेलं. त्यानंतर मी तक्रार करण्यासाठी नोंदवही मागितली. मात्र, तेव्हा त्यांनी ते देण्यास नकार दिला. मी निषेध नोंदवण्यासाठी तिथंच बसून राहिलो. त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनी एक अधिकारी आला. मी त्याला विचारलं की, तुम्ही कोण? त्यावेळी त्यानं मला अत्यतं अरेरावीनं उत्तर दिलं.’ ‘तो अधिकारी मला म्हणाला की, ‘मी एअर इंडियाचा बाप आहे.’  तेव्हा मी त्याला सांगितलं की, मी खासदार आहे. तेव्हा तो मला म्हणाला की, ‘तू काय नरेंद्र मोदी आहेस का?’ असं म्हणत त्यानं माझ्याशी पुन्हा अरेरावी सुरु केली. यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी माझा संयम सुटल्यानं मी त्या अधिकाऱ्याला ढकललं. तिथं हजर असणाऱ्या एअर होस्टेस्टनं देखील नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. माझं वागणं चुकीचं नव्हतं.’ ‘संविधानानं मला कुठंही प्रवास करण्याचा अधिकार दिला आहे.  मात्र, एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांनी माझ्या विमान प्रवासावर बंदी आणून मला संविधानानं दिलेला अधिकार हिरावून घेतला आहे. मी एक शिक्षक आहे. विन्रमता ही माझी शिकवण आहे. त्यामुळे जर माझी चूक झाली असेल तर मी संसदेची माफी मागतो, पण एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही.’ ‘याप्रकरणी माझ्यावर मीडिया ट्रायलही करण्यात आलं. पण त्या दिवसापासून मी मीडियाच्या हाती लागलो नाही. आज थेट मी संसदेत हजर झालो. गनिमी काव्यानं कसं लढायचं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. दरम्यान, याप्रकरणी माझ्यावर  दाखल करण्यात आलेलं  308 कलम हटवावं. तसेच एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रवींद्र गायकवाड यांनी केली. शिवसेना खासदार अनंत गीते खा. गायकवाडांच्या मदतीला खासदार रवींद्र गायकवाड यांनी आपलं म्हणणं लोकसभेत मांडल्यानंतर, शिवसेनेचे खासदार आणि मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रीपद सांभाळणारे अनंत गीते यांनीही खासदार गायकवाडांची बाजू घेतली. ‘खासदार रवींद्र गायकवाड हे या सभागृहाचे एक सन्मानित सदस्य आहेत. त्यांच्याबाबतीत प्रवासादरम्यान जी घटना घडली, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणत्याही खासदारावर विमान यात्रेदरम्यान काही धक्काबुक्की झाल्यास थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं हे अयोग्य आहे.’ ‘हा अन्याय असून, गृहमंत्री राजनाथ सिंह याबाबतीत आपलं म्हणणं मांडतील. याप्रकरणात अद्याप चौकशी सुरु आहे. या चौकशीत सत्य समोर येईल. तुम्ही चौकशी करा आम्ही रोखणार नाही. मात्र कोणत्याही चौकशीशिवाय एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खासदार गायकवाडांच्या प्रवासावर बंदी घालणं, हा कोणता न्याय आहे?  हे मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार जे जनतेचं आहे, ते कोणत्याही चौकशीशिवाय एका खासदारावर बंदी आणतं, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.’ ‘याची मला लाज वाटते. मात्र तरीही मी हवाई वाहतूक मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की अशाप्रकारचा एकतर्फी निर्णय होऊ नये. खासदार गायकवाडांवरील बंदी हटवण्यात यावी.’  हवाई वाहतूक मंत्र्यांचं उत्तर:   याप्रकरणी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी या निवदेनावर उत्तर  दिलं. ‘खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं अशोक गजपती राजू म्हणाले. संबंधित बातम्या:

'आम्हीपण हंगामा करू शकतो', शिवसेना खासदार संसदेत आक्रमक

VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद ताई म्हणून सांगते, विमानबंदी प्रश्नी सलोख्याने तोडगा काढा : महाजन प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज रवींद्र गायकवाड उस्मानाबादला आलेच नाहीत, ‘ते’ दोघेही… कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Nagpur Election 2026: महापालिकेचा कचरा संकलन कामाचा अनुभव ठरला फायद्याचा, थेट काँग्रेसची उमेदवारी; नागपूरात भाजपच्या दिग्गज नेत्या अन् माजी महापौरांच्या विरोधात शड्डू ठोकणार
महापालिकेचा कचरा संकलन कामाचा अनुभव ठरला फायद्याचा, थेट काँग्रेसची उमेदवारी; नागपूरात भाजपच्या दिग्गज नेत्या अन् माजी महापौरांच्या विरोधात शड्डू ठोकणार
Embed widget