एक्स्प्लोर
शाहीनबागेत येऊन गिफ्ट घेऊन जा; आंदोलनकर्त्यांचे मोदींना 'व्हॅलेंटाईन डे'चे आमंत्रण
सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीतील शाहीनबागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी व्हॅलेंटाईन डे' निमित्त पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिलंय.

नवी दिल्ली : सीएएविरोधात शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी इथं येऊन आमच्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करावं, असं आमंत्रण दिलंय. सुधारित नागरिकत्व कायदा(सीएए)आणि प्रस्तावित एनआरसी मागे घेण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी 15 डिसेंबरपासून हे आंदोलन शाहीनबाग येथे सुरू आहे. आजच्या दिवशी आंदोलनकर्ते पंतप्रधान मोदींसाठी एक 'प्रेमगीत' आणि 'सरप्राइज भेट'ही सादर करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोस्टर्स लावण्यात आले असून सोशल मीडियावरही हे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले आहे. "पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या, तुमचं गिफ्ट घ्या आणि आमच्याशी बोला.", असं वाक्य या पोस्टरवर लिहलं आहे.
तर, आम्ही आंदोलन मागे घेऊ
शाहीन बागेतील आंदोलनकर्ता तासीर अहमद म्हणाला की, पंतप्रधान मोदी असो वा गृहमंत्री अमित शहा किंवा इतर कोणी, ते येऊन आमच्याशी बोलू शकतात. जर ते आम्हाला समजावून सांगतील की जे घडत आहे ते घटनेच्या विरोधात नाही तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. तो म्हणाला, की सरकारच्या दाव्यानुसार सीएए 'एखाद्याचे नागरिकत्व देतही नाही आणि घेतही नाही. पण ते देशासाठी कसे उपयुक्त ठरेल हे कोणी सांगत नाही.
नागरिकत्व दुरस्ती कायद्याबद्दल ज्यांना शंका आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार : अमित शाह
चर्चा करण्यास तयार : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरस्ती कायद्याबद्दल कुणाला शंका असल्यास त्यांनी आम्हाला भेटून त्यावर चर्चा करावी, असं आवाहन केलंय. शाहीनबाग येथील आंदोलकांना सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय असेल तर ते आम्हाला येऊन भेटू शकतात. गृहमंत्रालयाच्या कार्यालयाकडून त्यांना तीन दिवसांच्या आत भेटण्याची वेळ दिली जाईल, असा शब्दही अमित शाह यांनी दिलाय. "ज्या कोणालाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल आक्षेप आहे, त्यांनी माझ्या कार्यालयाकडून चर्चेसाठी वेळ घ्यावा. भेटण्याची वेळ घेतल्यानंतर तीन दिवसांच्या आत मी त्यांना भेटेन आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर चर्चा करेन", असं अमित शाहांनी म्हटलं. यावेळी अमित शाह यांनी एनपीआरवरही आपली भूमिका मांडली. एनपीआरअंतर्गत कोणतेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
भिवंडी शाहीनबाग आंदोलनाचा सहावा दिवस, 14 आंदोलनकाऱ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
