एक्स्प्लोर

Israel Vs Iran War: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सने एन्ट्री, लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं उडी; मध्य पूर्वेमधील युद्धात दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?, A टू Z माहिती

Israel Vs Iran War: सलग दुसऱ्या दिवशी इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हल्ला सुरूच राहिला. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठे हल्ले करण्यात आले.

Israel Vs Iran War: सलग दुसऱ्या दिवशी इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हल्ला (Israel Vs Iran War) सुरूच राहिला. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठे हल्ले करण्यात आले. प्रामुख्याने संरक्षण दलांनी इराणच्या तीसहून अधिक सैन्य ठिकाणांना टार्गेट केलं. गेल्या 24 तासांत इस्त्रायल-अमेरिकेकडून इराणवर तब्बल 1,200 हून अधिक बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात इराणच्या तेहरान शहरामध्ये सर्वाधिक नुकसान झालं.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 216 लोकांचा मृत्यू झाला तर 747 लोक जखमी झाले आहेत. तर इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पुढील काळात हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा इस्त्रायलने दिलाय. या युद्धामुळे केवळ इस्रायल आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो. सरकारी इमारती, लष्करी तळ आणि गुप्तचर विभागाची कार्यालये इस्रायलच्या निशाण्यावर आहेत. राजधानीत अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लष्करी हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे.

युद्धात काल काय काय घडलं? (Israel Vs Iran War)

  1. खामेनेईसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  2. इराणवर बी-2 बॉम्बर्सने 2 हजार बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांची माहिती
  3. इराणची 9 जहाजेही नष्ट केली - डोनाल्ड ट्रम्प
  4. इराणच्या सैन्यानं शरण यावं अन्यथा मृत्यू निश्चित-ट्रम्प 
  5. इराणविरुद्धचा संघर्ष अजून चार आठवडे चालेल-ट्रम्प
  6. अमेरिकन जवानांच्या मृत्युचा बदला घेऊ अशी ट्रम्प यांची धमकी 
  7. इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये 9 जवान ठार, तीन अमेरिकन जवान
  8. जगभर कच्चे तेल महागले, प्रति बॅरेल किंमत 72 डॉलरवरुन 90 डॉलरवर
  9. जगभरात 2 हजार विमाने रद्द, भारतातली 350 विमाने रद्द
  10. लेबॅनॉनची इराणच्या बाजूनं युद्धात उडी, इस्रायलवर हल्ला 
  11. पाकमध्ये अमेरिकन वकिलातीत घुसणाऱ्या 22 आंदोलकांचा मृत्यू
  12. पाकिस्तानात अमेरिकेविरोधातील आंदोलनात 200 जखमी 
  13. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलच्या नेतान्याहूंशी बातचित, चिंता व्यक्त
  14. इराणमध्ये 1 हजार ठिकाणी हल्ले केल्याची अमेरिकन लष्कराची माहिती
  15. अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत 165 ठार अशी इराणी मिडीयाची माहिती
  16. इस्रायलकडून युद्धासाठी आणखी 1 लाख सैनिक तैनात

इराणवरील हल्ल्याचे कारण काय? (what reason for the war between Iran and Israel)

2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता- (Israel Vs Iran War)

इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. तसेच, येणाऱ्या काही आठवड्यांत बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सोने आणि चांदी महाग होतील. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण होते. गुंतवणूकदार पैसे शेअर बाजारातून काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवतात. यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती ऐतिहासिक पातळीवर जाऊ शकतात. 

संबंधित बातमी:

Ali Khamenei Death: अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणचे सर्वोच्च नेते कसे मारले गेले?; धक्कादायक फोटो समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Gas Cylinder : गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Iran vs Israel War Pakistan Fuel Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा पाकिस्तानला जबरदस्त धक्का, शाहबाज शरीफ यांचा टोकाचा निर्णय, सरकारी कामकाज 'वर्क फ्रॉम होम', शाळांनाही सुट्टी जाहीर
इराण-इस्रायल युद्धाचा पाकिस्तानला जबरदस्त धक्का, शाहबाज शरीफ यांचा टोकाचा निर्णय, सरकारी कामकाज 'वर्क फ्रॉम होम', शाळांनाही सुट्टी जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget