एक्स्प्लोर
हॉटेलमध्ये सेवा शुल्क देणं बंधनकारक नाही: केंद्र सरकार
![हॉटेलमध्ये सेवा शुल्क देणं बंधनकारक नाही: केंद्र सरकार Service Charge Not Mandatory In Hotels And Restaurants Latest Update हॉटेलमध्ये सेवा शुल्क देणं बंधनकारक नाही: केंद्र सरकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/04211042/Spicy_Food.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर लावण्यात येणाऱ्या सेवा शुल्काबद्दल केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारकडून सेवा शुल्काबद्दलच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवा शुल्क देणे आता बंधनकारक असणार नाही.
सेवा शुल्क देण्याचा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खर्च कमी होणार आहे.
‘हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये किती सेवा शुल्क द्यायचे, हे ग्राहकच ठरवतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार आता असणार नाही,’ असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.
‘सेवा शुल्क बंधनकारक नसल्याचा आणि पूर्णपणे ऐच्छिक असल्याचा निर्णय सर्व राज्य सरकारांना कळवण्यात आला आहे. यावर सर्व राज्यांनी योग्य पावले उचलावीत,’ असेही पासवान यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)