एक्स्प्लोर
Advertisement
शेअर बाजारात प्रचंड घसरण, सेन्सेक्स 1200 अंकांनी गडगडला
सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार उघडताच मोठी पडझड पाहायला मिळाली. आज (मंगळवार) सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला.
मुंबई : सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार उघडताच मोठी पडझड पाहायला मिळाली. आज (मंगळवार) सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही 371 अकांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्समध्ये झालेली घसरण ही 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.
अमेरिकन बाजारपेठेतल्या पडझडीचा परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यानं व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे आज अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली.
परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला. तसंच अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर भरभक्कम व्याज लावण्याची घोषणा जेटलींनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येतो आहे.
एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सलग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात बाजारात तब्बल 2500 अकांची घसरण झाली आहे.
बजेटच्या बरोबर एक दिवस आधी सेन्सेक्सने तब्बल 36283 अकांपर्यंतची विक्रमी उसळी घेतली होती. पण बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण सुरु झाली. सध्या सेन्सेक्स 33,500 आणि निफ्टी 10,300 अकांवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement